आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन:शांतीतून सुखाकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण यश आणि संपत्ती मिळवण्याच्या मागे धावतो आहे. त्यासाठी वाटेल ते करण्याची माणसाची तयारी आहे. जसजसे यश व संपत्ती मिळत जाते. तसतशा मानवाच्या गरजा व हव्यास वाढत जातो, पण त्यातून सुख, समाधान मिळतेच असे नाही, तर आपण संघर्ष आणि तणाव आपल्याकडे आकर्षित करतो. यश आणि संपत्तीबरोबरच सुख, आरोग्य आणि समाधान हवे असेल, तर त्यासाठी गरज आहे शांतीचा मार्ग अवलंबण्याची. जीवनातील चिंता, तणाव यांच्यातून बाहेर पडा. स्वार्थाच्या होरपळून टाकणार्‍या प्रखर उष्णतेतून बाहेर या आणि अंतर्मनातील त्या विश्रांती स्थानात प्रवेश करा. तेथील शांतीची सुखद हवा तुम्हाला नवचैतन्य, नवजीवन देईल.
शांती म्हणजेच स्वर्गाचे अधिराज्य होय ही शांती मिळवण्यासाठी ध्यान, स्वार्थ त्याग, सत्य, आध्यात्मिक शक्ती आपणास मदत करते. या स्वार्थी युगात नि:स्वार्थ प्रेम तसेच परिपूर्ण शांततेचा साक्षात्कार कसा घडवून आणावा, याचे विस्तृत विवेचन प्रस्तुत पुस्तकात केले आहे. शांती मिळवण्यासाठी आपण काय करावे आणि काय करू नये, याचेही वर्णन या पुस्तकात उत्तमरीत्या केले आहे.
पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर एकदा नजर टाकली, तरी पुस्तकाचे उपयोगित्व लक्षात येते. मनोगत, लेखकाविषयी यानंतर ध्यानाची शक्ती, ज्ञानाचा मार्ग दाखवणारा तारा, दोन स्वामी, स्वत्व आणि सत्य, आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे, नि:स्वार्थ प्रेमाचा साक्षात्कार, अनंतात प्रवेश, संत, ऋषी व रक्षणकर्ते : सेवेचा कायदा, परिपूर्ण शांततेचा साक्षात्कार अशी सुंदर प्रकरणे आहेत. त्यात अनेक उपप्रकरणेही आहेत. वाचतानाच मन हळूहळू शांत होत जाते असे वाटते. पुस्तकातील अनेक प्रकरणांत काव्यपंक्ती आहेत तसेच सुंदर मुखपृष्ठात निळ्याशार पाण्यावर एक बदक दाखवले आहे. शांततेच प्रतीक पाणी आणि पक्षी दाखवून पुस्तकातील अनेक पानांवर आकाशात स्वच्छंदपणे पक्षी उडताना दाखवले आहेत.
पुस्तकाचे नाव - द वे ऑफ पीस
लेखक - जेम्स अ‍ॅलन,
अनुवाद - प्रा. गो. द. पहिनकर
प्रकाशन - साकेत प्रकाशन, औरंगाबाद-पुणे
पृष्ठसंख्या -107, मूल्य - 100 रुपये