आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोहल्यावर चढताना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो तो तिच्या लग्नाचा. या दिवशी प्रत्येक मुलीला वाटतं की आपण आकाशातून उतरणार्‍या परीप्रमाणे दिसावं आणि प्रत्येकाने त्या दिवशी फक्त आपल्याकडे पाहावं. हे सगळं खरं ठरू शकतं, जेव्हा तुम्ही तुमच्या फॅशन स्टेटमेंटवर विशेष भर द्याल.

महाराष्ट्रीय लग्नांमध्ये वधूला प्रामुख्याने साडी नेसावी लागते, ज्याला शालू म्हणतात. हा शालू सुंदर व राजेशाही दिसण्यासाठी रेशमी असतो व त्यावर नक्षीदार असे जरीकाम केलेले असते. या साड्यांमध्ये आपल्याला हवे ते रंग मिळून जातात. सोबतच तुम्हाला सिक्वेन्स वर्क किंवा पॅच वर्क किंवा डायमंड वर्क आवडत असेल तर हे प्रकारही शालूमध्ये मिळतात. गडद वा हलके रंग असतातच, पण सध्या मरून, मोरपंखी, जांभळा, हिरवा हे रंग जास्त चालतात.

यासोबतच नेटच्या डायमंड वर्कच्याही खूप साड्या नववधूसाठी सध्या उपलब्ध आहेत. त्यातही तुम्हाला हवे तसे रंग व हवे तसे वर्क मिळते. या साड्यांसोबत जर तुमचा ओढणी वापरायचा विचार असेल तर नेहमी काँट्रास्टमध्ये वापरा. पण कोणत्याही कपड्याची खरेदी करतेवेळी ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवा की, तो रंग आपल्याला सूट होतो की नाही, म्हणजेच त्या रंगाने आपली त्वचा, कॉम्प्लेक्शन कसे दिसते याचा विचार करा. त्यासाठी गोर्‍या मुलींनी गडद किंवा हलके वा भडक रंग वापरले तरी चालतील; पण सावळ्या मुलींनी फक्त हलके आणि भडक रंग वापरावेत. साडीसोबत पारंपरिक दागिनेच चांगले दिसतात. सोन्याचे, हिर्‍यांचे दागिने साडीवर शोभून दिसतात. क्वचितप्रसंगी मोत्यांचेही.