आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर : सा रे ग म प ध नी सा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या प्रयोगात आपणास थोडे ध्वनिशास्त्र शिकायचे आहे. कोणत्याही यात्रेमध्ये सर्व बच्चे कंपनीचे आवडते वाद्य प्लास्टिकपासून बनवलेला बाजा असतो. अनेक नळ्या एकत्र करून हा बाजा बनवलेला असतो.
विविध वाद्यांमधून एवढे स्वर कसे काढता येतात याचे तुम्हाला कधी आश्चर्य वाटले नाही? वाद्यांचे अनेक प्रकार आहेत. ढोलकी, तबला, मृदंग, पखवाज यांना तालवाद्ये म्हणतात, तर व्हायोलिन, मेंडोलिन, सतार यामधून निघणारा ध्वनी निरनिराळ्या जाडीच्या तारा कंप पावल्या म्हणजे निघतो, पण सर्वात सोपे आणि वाजवण्यास अवघड वाद्य म्हणजे फुंकून वाजवण्याची वाद्ये. बासरी, सुंदरी, सनई, क्लॅरोनेट, सॅक्सॉफोन, धातूपासून बनवलेली फ्लूट एवढेच काय देवघरातील शंख फक्त हवा फुंकण्याने वाजतो. बासरीच्या ठरावीक व्यासाच्या नळीमधून कमी अधिक जाडीचा आवाज निघतो. जेवढा बासरीचा व्यास अधिक तेवढा ध्वनी कमी कंप्रतेचा तर व्यास जेवढा कमी तेवढा ध्वनी अधिक कंप्रतेचा. शिटी अधिक दूरवर ऐकू जाते याचे कारण त्यातून निघणारा ध्वनी अधिक कंप्रतेचा निघतो.
आजच्या प्रयोगात आपणास थोडे ध्वनिशास्त्र शिकायचे आहे. कोणत्याही यात्रेमध्ये सर्व बच्चे कंपनीचे आवडते वाद्य प्लास्टिकपासून बनवलेला बाजा असतो. अनेक नळ्या एकत्र करून हा बाजा बनवलेला असतो. प्रत्येक नळीच्या प्रारंभीच्या टोकास एक चपटे छिद्र त्यानंतर हवा बाहेर पडण्यासाठी एक वरील बाजूस असलेले छिद्र आणि क्रमाने कमी लांबीच्या नळ्या. आज आपण नळीची लांबी आणि त्यातून निघणारा आवाज यांचा काय संबंध आहे, हे शोधायचे आहे. यासाठी लागणारे साहित्य फक्त स्ट्रॉ आणि कातर. घरी जर बाजाची पेटी असेल तर सारेगमपधनीसा यांच्या आवाजाबरोबर तुम्हाला तुम्ही बनवलेले वाद्य जुळवायचे आहे. अर्थात बाजाची पेटी नसली तरी आपल्या प्रयोगावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही.
झाडाच्या पानांची पिपाणी कधी करून पाहिली असेल तर आज नेमकी आपण स्ट्रॉची पिपाणी करायची आहे. स्ट्रॉची एक बाजू दाबून चपटी करा. कात्रीने आकृतीत दाखवल्यप्रमाणे बाजूची स्ट्रॉ तिरकी कापल्यास तुमच्या स्ट्रॉची झकास पिपाणी बनेल. पातळ प्लास्टिकपासून बनवलेली असल्यास चपटे टोक तोंडात घालून हवा फुंका. त्यामधून आवाज निघेल. आता क्रमाने शेवटच्या टोकापासून कात्रीने स्ट्रॉची कापायची व परत आवाज कसा येतो ते ऐकायचे. जेवढी स्ट्रॉची लांबी कमी तेवढा त्यामधून निघणारा आवाज उंच निघतो. ध्वनी निर्माण होण्यासाठी कंपने आवश्यक आहेत. चपट्या टोकामधून निघालेली हवा कंप पावली म्हणजे ध्वनी निर्माण होतो. सहा सात स्ट्रॉ असतील तर त्यांची लांबी बदलून त्या सा रे ग म प ध नी सा असे स्वर निर्माण करण्यासाठी किती लांबीची स्ट्रॉ आवश्यक आहे हे थोड्या खटपटीने तुम्हाला सहज जमेल. बासरीमध्ये हाच उद्योग करण्यासाठी एकाच बांबूच्या नळीमध्ये ठरावीक अंतराने छिद्रे पाडलेली असतात. छिद्रावर बोट ठेवून तुम्ही हवेच्या स्तंभाची लांबी बदलली म्हणजे सारेगमपधनीसा ऐकू येते. ध्वनीचे एकक हर्ट्झ आहे. मानवी कानांना 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झचा ध्वनी ऐकता येतो. कमी लांबीच्या स्ट्रॉमधून अधिक तीव्र आवाज व अधिक लांब स्ट्रॉमधून जाड आवाज निघतो एवढे आज समजले तरी पुरे.
नळीची लांबी आणि आवाज
आज आपण नळीची लांबी आणि त्यातून निघणारा आवाज यांचा काय संबंध आहे, हे शोधायचे आहे. यासाठी लागणारे साहित्य फक्त स्ट्रॉ आणि कात्री. घरी जर बाजाची पेटी असेल तर सारेगमपधनीसा यांच्या आवाजाबरोबर तुम्हाला तुम्ही बनवलेले वाद्य जुळवायचे आहे. अर्थात बाजाची पेटी नसली तरी आपल्या प्रयोगावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही.