Home | Magazine | Divya Education | Career In Photonics

न्यू Avenue: 'फोटोनिक्स' : भौतिकशास्त्राची नवी शाखा

उषा अल्बुकर्क/संचालिका, करिअर स्मार्ट लिमिटेड | Update - Aug 24, 2015, 06:56 AM IST

फोटोनिक्स प्रकाश ऊर्जेचे उत्पादन आणि उपयोगाशी संबंधित विज्ञान आहे. त्याचे क्वांटम युनिट फोटॉन आहे.

 • Career In Photonics
  फोटोनिक्स प्रकाश ऊर्जेचे उत्पादन आणि उपयोगाशी संबंधित विज्ञान आहे. त्याचे क्वांटम युनिट फोटॉन आहे. भौतिकशास्त्राच्या या शाखेत प्रकाशाचे प्रमुख तत्त्व फोटॉनचे विस्तृत आणि वैज्ञानिक अध्ययन केले जाते. २१ व्या शतकाचे तंत्रज्ञान मानल्या जाणाऱ्या फोटोनिक्समध्ये आधुनिक लेजर, ऑप्टिक्स, फायबर ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल डिव्हायसेसचा वापर टेक्नॉलॉजीच्या विस्तृत क्षेत्रात केला जात आहे. त्यात मुख्यत: पर्यायी ऊर्जा, मॅन्युफॅक्चरिंग, हेल्थकेअर, टेलिकम्युनिकेशन, एन्व्हायर्नमेंटल, मॉनिटरिंग, एअरोस्पेस, सॉलिड स्टेट लायटिंगचा समावेश आहे. याच नवीन व्यावहारिक वापरातील वाढत्या भूमिकेमुळे हे रिसर्च आणि व्यावसायिक विकासातही हे महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे.

  पात्रता : फोटोनिक्समध्ये ग्रॅज्युएशनसाठी विज्ञान शाखेत(फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स) बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फिजिक्स आणि मॅथ्स, अप्लायड फिजिक्स या इलेक्ट्रॉनिक्समध्ये बॅचलर्स डिग्री असणारे विद्यार्थी फोटोनिक्समध्ये एमएस्सी करू शकतात. यात एमटेक, एमफिल आणि पीएचडी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवाराजवळही फिजिक्स वा फोटोनिक्समध्ये मास्टर्स डिग्री असायला हवी.

  संधी : फोटोनिक्समध्ये प्रशिक्षित प्रोफेशनल्सना जगभरात मागणी आहे. या विषयात ग्रॅज्युएट विद्यार्थी तसेच इंजिनिअर, टेक्निशियन वा टेक्नॉलॉजिस्ट, सरकारी तसेच औद्योगिक प्रयोगशाळांमध्ये रिसर्च ऑफिसर, विद्यापीठे व सरकारी कार्यालयांमध्ये प्रोफेशनल आॅफिसर म्हणून करिअरची सुरुवात करू शकतात. कामाचे स्वरूप पदावर अवलंबून असते. शास्त्रज्ञांना फोटोनिक्सवर संशोधन करायचे असते, तर इंजिनिअर या क्षेत्रात डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगबरोबरच समस्यांचे निवारण करतात. सुरुवातीस हे अनुभवी इंजिनिअर्सचे असिस्टंट म्हणून काम करतात. आणि अनुभव प्राप्त झाल्यानंतर रिसर्च डायरेक्टर्स वा प्रिन्सिपल इंजिनिअर्सच्या पदावर जागा मिळवू शकतात. फोटोनिक्स ग्रॅज्युएट्सची आवश्यकता मुख्यत: टेलिकम्युनिकेशन कंपन्यांमध्ये होते. याव्यतिरिक्त सेमिकंडक्टर टेक्नॉलॉजी, फायबर अँड इंटिग्रेटेड ऑप्टिक्स, ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स अँड सॉफ्टवेअरच्या क्षेत्राशी जोडलेल्या इंडस्ट्रीज आणि आर अँड डी ऑर्गनायझेशन्समध्ये मुख्य पदांवर त्यांची नियुक्ती केली जाते.
  इथे करा हा कोर्स
  >द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोनिक्स, कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी.
  >इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नई.
  >इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्क्नॉलॉजी, दिल्ली.
  >राजर्षी शाहू महाविद्यालय, डिपार्टमेंट ऑफ फोटोनिक्स, लातूर.
  >डिपार्टमेंट ऑफ अप्लायड ऑप्टिक्स अँड फोटोनिक्स, कोलकाता.

Trending