आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Career : Police Assistant Inspector Selection Examination 2013

करिअर : पोलिस सहायक निरीक्षक निवड परीक्षा-2013

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मचारी निवड आयोगातर्फे दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व केंद्रीय गुप्तचर विभागात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून उमेदवारांची निवड करण्यासाठी घेण्यात येणा-या सहायक पोलिस निरीक्षक निवड परीक्षा-2013 साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
* जागांची संख्या व तपशील : एकूण उपलब्ध जागांची संख्या 1176 असून, यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
* आवश्यक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हवेत.
* वयोमर्यादा : 25 वर्षे. राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
* निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर 10 जून 2013 व 18 ऑगस्ट 2013 या दिवशी घेण्यात येईल. लेखी परीक्षा महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक व अमरावती या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल.
लेखी परीक्षेत निर्धारित गुणांक मिळवणा-या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
* अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून उमेदवारांनी 100 रु. भरणे आवश्यक आहे. हे शुल्क अर्जदार विहित नमुन्यातील अर्ज पाठवणार असल्यास त्यांनी अर्जासह निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणा-या सेंट्रल रिक्रुटमेंट फी स्टँप स्वरूपात तर संगणकीय स्वरूपात अर्ज करीत असल्यास त्यांनी 100 रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा तिच्या सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत चालानद्वारा भरणे आवश्यक आहे.
* अधिक माहिती व तपशील : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 16 ते 22 मार्चच्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या www.ssc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
* अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर तर विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज क्षेत्रीय निदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन 101, महर्र्षी कर्वे मार्ग, मुंबई 400020 या पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2013.
ज्या पदवीधरांना पोलिसदलात सह-निरीक्षक होण्याची इच्छा असेल त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.