आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेस टू फेस:विकणे-विकत घेणे समजून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्र. १. मला बीकॉमनंतर एमबीए करायची इच्छा आहे, पण स्पेशलायझेशन म्हणून मार्केटिंग घ्यावे की एचआर कळत नाही. कारण मला बोलण्याची, संवादाची आवड आहे.
- प्रशांत कदम, ठाणे.
उत्तर : तुमचा प्रश्न खरोखर चांगला आहे. बोलता येणं, संवादाची आवड असणं या दोन्ही गोष्टी एचआर आणि मार्केटिंगसाठी आवश्यक आहेतच, परंतु प्रश्न त्यांच्यामध्येच असलेल्या स्पेशलायझेशनचा आहे. मार्केटिंगमध्ये बोलणं अत्यावश्यक आहे, ज्यामुळं तुमच्या कंपनीचा बिझनेस वाढू शकतो. एचआरमधील बोलणं हे कर्मचारी, वरिष्ठ, ग्राहक यांच्यापुरतं मर्यादित असून तुमच्या बोलण्याच्या स्वभावाचा कंपनीच्या बिझनेसवर प्रत्यक्ष फरक पडत नाही, कारण इथे तुम्ही कोणतीही वस्तू विकत नाही तर वस्तू विकण्याची कला, कौशल्य असणा-या व्यक्तीला पारखून तुम्ही नोकरीवर ठेवता. तेव्हा यामधील सीमारेषा समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
आव्हाने लक्षात घ्या... कंपनीला रिझल्ट, डेडलाइन, टार्गेट द्यावेच लागते
प्र. २. सध्या मी एका खासगी कंपनीमध्ये अकाउंट्समध्ये आहे, पण दोन वर्षांपासून काही पगारवाढ नाही आणि इथे काही फारसा स्कोपही नाही, तर मार्केटिंगमध्ये मी प्रयत्न करू शकतो का? - नीलेश जोशी, औरंगाबाद.
उत्तर : कामाचा ‘स्कोप’ वाढवणं हे खरं तर आपल्याच हातात असतं. बाकीचे निर्णय तुम्हीच उत्तम घेऊ शकता. मात्र, मार्केटिंग क्षेत्र म्हणजे बिनभांडवली धंदा म्हणतात. तुमच्याकडे जर ग्राहकाला आपली वस्तू विकण्याचं कसब असेल तर बाकीच्या गोष्टी दुय्यम ठरतात. फक्त मोठमोठ्या कंपन्या एमबीए इन मार्केटिंग असलेले उमेदवारच घेतात. तेव्हा या गोष्टीचा विचार करावा. शिवाय कंपनीमध्ये तुम्हाला खूप मोठ्या टार्गेटचा सामना करावा लागणार. डेडलाइन्स पूर्ण कराव्या लागणार आणि कंपनीला रिझल्ट द्यावा लागणार. तेव्हा या सर्व शक्यता, आव्हाने लक्षात घ्या. उगाच आगीतून फुपाट्यात जाण्यात काही अर्थ नाही. लांबून एखादी गोष्ट आकर्षक वाटली, तरी प्रत्यक्षात तिथे वेगळे रूप भासू शकते.
घाबरू नका, मातृभाषेतून शिकल्याने अडचणच नाही
प्र.३. मी सध्या दहावीची परीक्षा दिली आहे. माझे सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. यापुढे सगळं इंग्रजीतून शिक्षण झेपेल कां?
- अर्चना देशमुख, औरंगाबाद.
उत्तर : तुमच्या मातृभाषेतून शिकल्यामुळे तुम्हाला इंग्रजी शिकायला अडचण येणार नाही. काहीही घाबरून जाण्याचं कारण नाही. फक्त जरा जास्त जोर देत मेहनत करावी लागेल. इंग्रजी बातम्या ऐकणं, इंग्रजी पेपर वाचणं आणि त्यासारख्या बातम्या मराठी पेपरमध्ये वाचणं असा अभ्यास करून तुम्ही या प्रश्नावर मात करू शकाल. इंग्रजी ऐकणं, वाचणं आणि आत्मविश्वासाने बोलण्याचा सराव करणं मात्र सातत्याने व्हायला हवं.