आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेस टू फेस: जाहिरात क्षेत्रात मोठ्या संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाहिरात क्षेत्रात माेठ्या संधी
प्र. १ . मी बी. कॉम. झाल्यानंतर मासमीडिया, कम्युनिकेशनचे शिक्षण घेऊन अॅडव्हरटायझिंग करण्याचा विचार करतोय. त्यासाठी नेमकं काय लागतं आणि पुढे स्कोप आहे का?
- संजय गद्रे, पुणे.


उत्तर: केवळ भारतामध्येच नव्हे तर भारताबाहेरही जाहिरात क्षेत्र आज खूप मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. या क्षेत्रासाठी खरं तर पुस्तकी शिक्षणापेक्षा सुद्धा “प्रतिभा” आणि सतत नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची कुवत असावी लागते. या दोन्ही गोष्टी दुर्दैवाने शिकून येत नाही. त्यामुळे तुमच्याकडे जर प्रतिभा असेल, सृजनशीलता असेल, बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल करून एका विशिष्ट वेळेच्या चौकटीत “टार्गेट” पूर्ण करण्याची जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर या क्षेत्रात तुमचे स्वागतच आहे. इथे डिजिटल मार्केटिंग, मीडिया प्लॅनिंग, चॅनेल मार्केटिंग, रेडिओ पी.आर. आऊटडोअर मार्केटिंग अशा कितीतरी विभागांसाठी काम करता येऊ शकतं. शिवाय जाहिरातीसाठी लेखन, संगीत, डबिंग या आणखी वेगळ्या वाटेवरच्या गोष्टीही आहेतच. सद्या या क्षेत्रात नव्यानेच मुशाफिरी करणाऱ्यांना अंदाजे तीन ते पाच लाख रु.दरम्यान वार्षिक वेतन मिळते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, जनरल मॅनेजमेंट घेऊन एम.बी.ए. करता येऊ शकते...
बातम्या आणखी आहेत...