आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Carrier In Entertainment Article In Divya Education

छंद म्हणजे मनोरंजन, विकास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एज्यु कॉर्नर (छंदातून तणाव घालवा)
दररोज त्याच त्याच गोष्टी करून जेव्हा कंटाळा येतो, तेव्हा हेच छंद आपल्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करतात. ताणतणावापासून दूर ठेवतात. नवे काही तरी करण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे नकळतच व्यक्तिमत्त्व विकास घडून येतो. त्यामुळे प्रत्येकाने छंद हे जोपासलेच पाहिजेत. प्रत्येक वेळी जन्मत:च आपल्याकडे कलाकौशल्य असतात असे नाही.

छंद सुटीपुरते मर्यादित नकाे
सुटी म्हणजे मौजमजा. सुटी म्हणजे करमणूक. सुटी म्हणजे छंद. हो हो छंद. पूर्ण वर्षभर शाळा, क्लास फक्त अभ्यास एके अभ्यास. आजकालच्या स्पर्धामय युगात, तर चांगले टक्के हीच यशाची गुरुकिल्ली, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थी या अभ्यासाच्या ओझ्याखाली वावरत असतात. म्हणून ज्या गोष्टी आपण वर्षभर करू शकत नाही. त्या सुटीत केल्या जातात. आपल्या आवडीनिवडींचा वेळ म्हणजे सुटी, छंद जोपासण्याचा कालावधी म्हणजे सुटी. परंतु माझ्या मते छंद हे सुटीपुरते मर्यादित असू नये. छंद हा फक्त सुटीचाच भाग असू नये. कारण छंद म्हणजे अशी गोष्ट ज्यामुळे आपले मनोरंजन होते. करमणूक होते.
नवचैतन्य निर्माण करता येते

"All work and no play, makes & Jack a dull boy' दररोज त्याच त्याच गोष्टी करून जेव्हा कंटाळा येतो, तेव्हा हेच छंद आपल्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करतात. ताणतणावापासून दूर ठेवतात. नवे काही तरी करण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे नकळतच व्यक्तिमत्त्व विकास घडून येतो. थोडक्यात It makes you feel good about you. It makes your life interesting. त्यामुळे प्रत्येकाने छंद हे जोपासलेच पाहिजेत. प्रत्येक वेळी जन्मत:च आपल्याकडे कलाकौशल्य असतात असे नाही. पद्धतशीरपणे विशिष्ट तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशिक्षणाखाली आपण नक्कीच विविध कला अवगत करू शकतो.

एक आगळंवेगळं स्थान निर्माण कराल
सर्वोत्कृष्ट… अतिउत्तम अशी व्यक्ती सहजच तुमच्या मनात एक आगळंवेगळं स्थान निर्माण करील. हो ना? किती छान वाटलं ना फक्त कल्पना करूनच. मग आपणही का मागे राहू. या चला तर मग आपणही ही कल्पना प्रत्यक्षात घडवूया. हीच योग्य वेळ आहे. या सुटीत श्रीगणेशा करू या. तुम्हाला ज्यात आवड आहे, असे छंद बाळगा. बागकाम, मार्शल आर्ट, बॉक्सिंग संगीत वाद्य शिकणे, नाच, दागिने बनविणे, मातीच्या वस्तू बनविणे, फोटोग्राफी, एखाद्या खेळात प्रावीण्य मिळविणे, अशा विविध छंदांपैकी ज्यात तुम्हाला रुची आहे ते निवडा. त्याचे प्रशिक्षण घ्या. परंतु हे प्रशिक्षण फक्त प्राथमिक प्रशिक्षण असू नये. पद्धतशीरपणे, नित्यनियमाने प्रशिक्षण घेत त्यात तज्ज्ञ व्हा. मास्टर बना. शालेय वर्ष सुरू झाले तरीही नित्यनियमाने थोडा वेळ याकरिता जरूर द्या आणि ते फारसे अवघडही नाही. योग्य नियोजनाने हे करणे सहज शक्य होईल.
(smit.kelkar@gmail.com)