आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Carrier In Thermal Power Technology Article In Divya Education

थर्मल पॉवर टेक्नॉलॉजीमधील विशेष पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिंदाल इन्स्टिट्यूट ऑफ पॉवर टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित पदव्युत्तर पदविका व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

>अभ्यासक्रम : उपलब्ध जागांची संख्या १२०.
शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन यासारख्या विषयातील पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा : १ जुलै २०१५ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे. } थर्मल पॉवर टेक्नॉलॉजीमधील

पदव्युत्तर पदविका : उपलब्ध जागांची संख्या ६०.

शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल अँड इन्स्ट्रुमेंटेशन
इंजिनिअरिंग यासारख्या विषयातील पदविका परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा : अर्जदारांचे वय १ जुलै २०१५ रोजी २७ वर्षांहून अधिक नसावे.

निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावरील निवडक शहरांमधील परीक्षाकेंद्रांवर २१ जून २०१५ रोजी घेण्यात येईल.

अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह पाठवायचे शुल्क : १००० रु.चा ‘जेआयपीटी’च्या नावे असणारा व रायगड येथे देय असलेला डिमांडड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी जिंदाल इन्स्टिट्यूट ऑफ पॉवर टेक्नॉलॉजीच्या दूरध्वनी क्र. ०७७६७-३०२४५४ वर संपर्क साधावा. अथवा संस्थेच्या www.jipt.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांडड्राफ्टसह असणारे कागदपत्र जिंदाल इन्स्टिट्यूट ऑफ पॉवर टेक्नॉलॉजी, तामणर, रायगड (छत्तीसगड) ४९६१०८ या पत्त्यावर ३१ मे २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस
कोलकाता विद्यापीठाच्या विद्यमाने देण्यात येणाऱ्या संशोधनपर एमएस्सी, पीएचडी अभ्यासक्रमांमध्ये नोंदणी करण्यासाठी खालील प्रमाणे संधी उपलब्ध आहेत.

> संशोधनपर पीएचडी अभ्यासक्रम : २०१५ : अर्जदारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अप्लाइड मॅथमॅटिक्स, बायोफिजिक्स वा बायोकेमिक्स्ट्री यासारख्या विषयातील एमएस्सी पात्रता कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संशोधनपर कामाची आवड असायला हवी.

> पदव्युत्तर एमएस्सी, पीएचडी संयुक्त अभ्यासक्रम : अर्जदारांनी बीएस्सी पदवी, गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेऊन कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी जेईएसटी अथवा एनजीपीई यासारखी पात्रता परीक्षा दिलेली असावी. निवड प्रक्रिया : अर्जदारांची संबंधित पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. पाठ्यवेतन व तपशील : उमेदवारांना संशोधनपर पीएचडीसाठी नियमानुसार पाठ्यवेतन देण्यात येईल. एमएस्सी, पीएचडी संयुक्त अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या एमएस्सी अभ्यासक्रमाच्या दोन वर्षे कालावधीसाठी दरमहा १२००० रु. व त्यानंतर त्यांची पीएचडीसाठी नोंदणी झाल्यावर उर्वरित कालावधीसाठी नियमानुसार संशोधनपर पाठ्यवृत्ती देण्यात येईल.

www.bose.res.in किंवा http://newweb.bose.res.in/Acodemic Programmes/Admission.jsop या संकेतस्थळांना भेट द्यावी. अर्जाची शेवटची तारीख १३ मे २०१५ आहे.