आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर संधी : विविध प्रकारचे रोजगार मिळवून देणारी राष्ट्रीय संस्था

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली 86 वर्षे शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन या विविध क्षेत्रात कार्यरत असलेली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ही विविध प्रकारचे रोजगार मिळवून देणारी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी देशातील आघाडीची संस्था आहे. संस्थेच्या वतीने नियमितपणे प्रशिक्षण तसेच अल्प मुदतीच्या वर्गांचे देशभर आयोजन करण्यात येते. त्यातील विशेष म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर हा एक वर्षाचा कालावधी असलेला अभ्यासक्रम, संपूर्ण देशभर तो शिकवण्यात येतो. बडोदा येथे संस्थेची फायर अकॅडमी आहे. कर्नाटक तसेच अन्यत्रदेखील अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते. आयजीएनयोयू अंतर्गत वेगवेगळ्या विद्यापीठांशी संबंधित अभ्यासक्रमांचेही प्रशिक्षण देण्यात येते. संस्थेची देशभर 26 केंद्रे आहेत. या संस्थेने आयोजित केलेले विशेष अभ्यासवर्ग पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अर्बन गर्व्हनन्स (पीजीडीयूजी) लोकप्रशासन, प्रशासकीय कायदे, नगर व्यवस्थापन, शहर व्यवस्थापन, पर्यावरण नियोजन आणि व्यवस्थापन, शहरी दारिद्र्यनिर्मूलन, नगरविकास आदी विषयांचे प्रशिक्षण या अंतर्गत दिले जाते. अभ्यासक्रमाचा कालावधी दोन सत्रांचा आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर अशी त्याची प्रवेश पात्रता आहे.
अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (एडीएमएलटी) हा अभ्यासक्रम वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. यात हेमॅटोलॉजी, ब्लड बँक, मायक्रोबायोलॉजी, सेरोलॉजी, क्लिनिकल पॅथॉलॉजी या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचा कालावधी 18 महिन्यांचा असून सहा महिन्यांच्या तीन सत्रांमध्ये तो पूर्ण होतो. प्रवेश विद्यार्थ्यांची पात्रता ही बी.एस्सी. पदवीधारक अशी आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट (पीजीडीएचएचएम) हा अभ्यासक्रम हॉस्पिटल व हेल्थकेअर संबंधित प्रशिक्षणावर आधारित आहे. हे दोन सत्रांमध्ये वर्षभरासाठी चालणारा अभ्यासक्रम आहे.त्यासाठी वैद्यकीय क्षेत्राशी किंवा विज्ञान शाखेचा पदवीधर असावा, अशी पात्रता आहे. र्नसिंग प्रशिक्षण घेतलेले किंवा दोन वर्षाचा र्नसिंग क्षेत्राचा अनुभव घेतलेल्या पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी (डीएफटेक) अन्न प्रक्रिया, विश्लेषण, निवड, सुरक्षा, आरोग्य, भेसळ, निरीक्षण, नियमितता यांच्याशी संबंधित बाबी या अभ्यासक्रमात शिकवण्यात येतात.त्यासाठी बी.एस्सी, अथवा 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणानंतर उपलब्ध व्यवसाय संधी खालील प्रमाणे:-
- अन्नप्रक्रिया व उत्पादन उद्योग, हॉटेल, रेस्टॉरंट, रिसोर्ट, एअरवेज, प्रयोगशाळा मदतनीस - संशोधन केंद्र, प्रयोगशाळा तसेच पर्यवेक्षक म्हणून बिग बझार, फूड मॉल्स, मध्यान्ह भोजन उपक्रम (इस्कॉन, अक्षय पात्र योजना), कॅटरिंग र्सव्हिंस या उद्योगात हा डिप्लोमा पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना फूड इन्स्पेक्टर किंवा फूड क्वालिटी कंट्रोलर म्हणून काही वर्षाचा अनुभव घेता येतो.
- डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस (डीपीएचएस) पात्रता -12 वी विज्ञान शाखा किंवा कुठल्याही शाखेचा पदवीधर कालावधी - 2 वर्षे. संधी - शासकीय, निमशासकीय, अशासकीय, कार्पोरेट क्षेत्र, रेल्वे व स्थानिक संस्थांमध्ये उद्योगांच्या व रोजगाराच्या संधी.
- बीएस्सी, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी (बी.एस्सी.एमएलटी) - सार्वजनिक, खासगी, कॉर्पोरेट, स्वयंसेवी, ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध कालावधी -साडेतीन वर्षे प्रवेश पात्रता - 12 वी विज्ञान शाखा.
- सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा - या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उत्तम करिअर करण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होते. आरोग्य विभागाशी संबंधित या अभ्यासक्रमामुळे या क्षेत्रात वेगवेगळया पद्धतीने कार्य करण्याची संधी मिळते. त्याशिवाय वैद्यकीय तसेच तांत्रिक विभागात मदतनीस म्हणून, फिल्ड असिस्टंट, प्रकल्प समन्वयक म्हणूनदेखील कार्य करता येते. याचा कालावधी हा 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी 12 महिन्यांचा आहे. तर दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी 18 महिन्यांचा आहे.
- ग्रॅज्युएट इन फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी बी.एस्सी (एफएसटी) - दी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एफएसएसआय) यांच्या माध्यमातून अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी अन्न विज्ञान अथवा तंत्रज्ञान विभागाची पदवी देणारा अभ्यासक्रम आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट लागू केला आहे. सध्या त्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम पूर्ण करणाºयांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. कालावधी - तीन वर्षे. प्रवेश पात्रता - 12 वी विज्ञान किंवा अन्य प्रक्रिया संबंधित डिप्लोमा हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नोकरी लागलेली आहे.
-फायरमन ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी- रासायनिक उद्योगातील प्रदूषण तसेच सुरक्षा, त्याचबरोबर पायाभूत क्षेत्र, शासकीय निवासस्थाने उद्योगसंस्था, हॉटेल्स, गगनचुंबी इमारतींची अग्निशमन सुरक्षा आदींसाठी फायरमन उपलब्ध करून देण्यासाठी फायरमन ट्रेनिंग अकॅडमी कार्य करते. बडोदा येथे नॅशनल फायर अकॅडमीतून प्रशिक्षण दिले जाते. याचा कालावधी सहा महिन्यांचा आहे. त्यासाठी पात्रता ही दहावी किंवा बारावी अथवा तत्सम प्रशिक्षण अशी आहे. अधिक माहितीसाठी उपसंचालक /प्राचार्य /अभ्यासक्रम समन्वयक यांच्याशी खालील ठिकाणी संपर्क साधावा. (वेळ - सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 ) ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट विस्तारित प्रशिक्षण केंद्र, एम.एन.रॉय, मनुष्यबळ विकास संकुल, एफ ब्लॉक, वांद्रे झकुर्ला संकुल, टीपीएस रोड नंबर-12, टिचर्स कॉलनीच्या मागे, वांद्रे (पूर्व), मुंबई - 400 051. दूरध्वनी : 0091-22-26571713, 26571714, 26571715, 26572286 मोबाइल : 9819053092, 9820136367, 9920872129, फॅक्स : 0091-22-26572286, 26572115 ईमेल anshetty@aiilsg.org वेबसाईट-www.aiilsg.org