आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Catal Fetal And Child Labour On Books Coming Soon

भ्रूणहत्या, बालमजुरीवरील कांदबरी लवकरच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांचा खजिना लक्ष्मीकांत देशमुख यांच्या आगामी पुस्तकांमधून वाचकांसाठी खुला होणार आहे. गोरेगाव फिल्म सिटीचे कार्यकारी संचालक म्हणून सध्या कार्यरत असणाºया देशमुख यांची चार पुस्तके येत्या काही महिन्यांमध्ये प्रकाशित होणार आहेत. वाचकांना त्याच्या लेखनात पूर्णपणे एक वेगळे अनुभवविश्व दिसेल. मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील असलेले देशमुख नोकरीच्या निमित्ताने नांदेडमध्ये स्थायिक झाले असले तरी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून साडेतीन वर्षे काम करताना आलेले अनुभव शब्दबद्ध करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. देशमुख यांची आतापर्यंत 15 पुस्तके प्रकाशित झाली असून, यामध्ये इन्किलाब विरुद्ध जिहाद, पाणी पाणी, अंधेरनगरी, बखर भारतीय प्रशासनाची या पुरस्कारविजेत्या साहित्यकृतींचा यामध्ये समावेश आहे. दोनच दिवसांपूर्वी लक्ष्मीकांत देशमुख आणि कोल्हापूरच्या आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांनी लिहिलेल्या अविस्मरणीय कोल्हापूर या पुस्तकाचेही प्रकाशन कोल्हापुरात झाले. प्रख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या छायाचित्रांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे.

देशमुख कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असताना भ्रूणहत्येविरोधात ठोस भूमिका घेत त्यांनी सायलेंट आॅब्झर्व्हर ही यंत्रणा विकसित करून गर्भलिंग चिकित्सेवर प्रभावी मर्यादा आणल्या. याच विषयावरील आठ कथांचा संग्रह मनोविकासतर्फे प्रकाशित करण्यात येणार असून, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी असे या पुस्तकाचे नाव आहे. 45 ललितलेखांचा समावेश असलेले मधुबाला ते गांधी हा ललितलेखसंग्रह दिलीपराजतर्फे प्रकाशित करण्यात येणार असून, हरवलेले बालपण ही बालमजुरांवरील कांदबरी अंतिम टप्प्यात आहे. प्रशासनावरील त्यांचे एक इंग्रजी पुस्तक दिल्लीच्या संस्थेकडून प्रकाशित केले जाणार असून दिलीपराज प्रकाशनतर्फे इन्किलाब ते जिहादजी जनआवृत्तीही प्रकाशित केली जाणार आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना देशमुख यांना अतिशय वेगवेगळे कंगोरे असलेले अनुभव आले आहेत. जनतेची मानसिकता, अधिकार्‍यांचा दृष्टिकोन, स्वयंसेवी संस्था, राजकीय नेते. या सर्व अनुभवांचं चित्रण देशमुख यांच्या या कादंबर्‍यांमधून झालेलं वाचकांना वाचायला मिळणार आहे.
मुलाखत : समीर देशपांडे