आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍पर्धा परीक्षाः सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सेस एक्झामिनेशन : 2013

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सेस (असिस्टंट कंपाउंट्स) एक्झामिनेशन-2013 द्वारा केंद्र सरकारअंतर्गत असणार्‍या पोलिस दलांमध्ये अधिकारीपदावर निवड करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
जागाची संख्या व तपशील : या निवड परीक्षेद्वारा नियुक्त करण्यात येणार्‍या पदांची संख्या 424 असून त्यामध्ये सीमा सुरक्षा बल 110, केंद्रीय रेल्वे पोलिस दल 138, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल 56व इंडो-तिबेटियन पोलिस दल 120 याप्रमाणे जागांचा समावेश आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हवेत.
वयोगट : 20 ते 25 वर्षे. राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर 20 ऑक्टोबर 2013 रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळवणार्‍या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी, मुलाखत व वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून 200 रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 5 ते 12 जुलै 2013 च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2013. ज्या पदवीधरांना केंद्र सरकारअंतर्गत सशस्त्र पोलिस दलात अधिकारीपदावर आपले करिअर करायचे असेल अशांसाठी ही संधी उपयुक्त ठरू शकते.