आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत्स्यविज्ञान विषयातील संशोधनपर पीएचडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई येथे मत्स्यविज्ञान, मत्स्योत्पादन व संबंधित विषयात उपलब्ध संशोधनपर पीएचडी करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

जागांची संख्या व तपशील : या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध एकूण जागांची संख्या 41 असून त्यापैकी 6 जागा अनुसूचित जातीच्या, 3 जागा अनुसूचित जमातीच्या, तर 10 जागा इतर मागासवर्गीयांंसाठी राखीव.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी मत्स्यविज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी वा बायोलॉजिकल सायन्समधील पदवी घेऊन त्यानंतर मत्स्योत्पादनातील पदविका असावी व त्यांना संबंधित कामाचा सुमारे 3 वर्षांचा अनुभव असायला हवा.

वयोमर्यादा : अर्जदारांचे वय 31 जुलै रोजी कमीत कमी 22 वर्षे असावे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा 7 जुलै 2013 रोजी घेण्यात येईल.

लेखी निवड परीक्षा निर्धारित गुणांक मिळवणार्‍या उमेदवारांची 8 जुलै रोजी मुलाखत घेऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.

पाठ्यवृत्ती व तपशील : निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या संशोधन कालावधीत दरमहा 10,500 रु. पाठ्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय सेवारत उमेदवारांना दरमहा 3000 रु. अतिरिक्त यशी देण्यात येईल.

अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 350 रु.चा आयसीएआर युनिट, सीआयएफई, मुंबई यांच्या नावे असलेला व मुंबई येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.

तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबईच्या दूरध्वनी क्र. 022-26374307 वर संपर्क साधावा. अथवा इन्स्टिट्यूटच्या www.cife.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्जाचा पत्ता व मुदत : विहित नमुन्यातील पूर्णे भरलेले व कागदपत्र तपशिलासहचे अर्ज सीनियर रजिस्ट्रार, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, पाच मार्ग, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (प.), मुंबई-400061 या पत्त्यावर तारीख 30 मे 2013. पर्यंत पाठवावेत.