नव्या सुविधांसह गुगल / नव्या सुविधांसह गुगल टीव्ही

दिव्य मराठी नेटवर्क

Jan 20,2012 07:50:59 AM IST

सीइएस 2012(कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो) मध्ये अनेक प्रमुख कंपन्या सहभागी होत आहेत. या दरम्यान एलजी गुगल टीव्ही सादर होणार आहे. अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टिम्सच्या चाहत्यांना अशा प्रकारचे नवीन मनोरंजन मिळणार आहे. यात एलजीची थ्रीडी आणि स्मार्ट टीव्ही टेक्नॉलॉजीच्या सुविधा असणार आहेत.
ही वैशिष्ट्ये गुगलमार्फत विकसित करण्यात येणाºया अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये असल्याने, प्रेक्षक एलजीच्या मॅजिक रिमोट क्वर्टीबरोबर चालवू शकतील. सोशल नेटवर्किंग, सर्च आणि टीव्हीच्या अन्य सुविधा यात देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हॉलमध्ये बसल्या जागी प्रेक्षकाला अनेक सेवासवलती मिळत जातात. ज्याचा वापर तो आपल्या सोयीनुसार करू शकतो.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स आणि होम इंटरटेनमेंटचे अध्यक्ष हैविस वॉनच्या मते, एलजी सातत्याने आपल्या ग्राहकांना घरबसल्या करमणुकीचे उत्तम मार्ग दाखवतो. एलजीची वैशिष्ट्ये आत्मसात करून गुगल टीव्ही आणखीनच चांगली सुविधा देऊ शकेल. ग्राहकांना हा एक नवा अनुभव होता. या टीव्हीमध्ये थ्रीडी सिनेमा बघण्याचा आनंद देण्याची क्षमता आहे. मनोरंजनाच्या चाहत्यांसाठी एलजी गुगल टीव्हीमध्ये सर्व वैशिष्ट्ये समाविष्ट राहतील, जी त्यांना बघण्यास मिळणार आहेत.

X
COMMENT