आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकळजनांचा कैवारू ! गोपीनाथ मुंडेंबद्दल भरभरून बोलले छगन भुजबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागे वळून पाहताना 25 वर्षांपूर्वीचा काळ माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला आहे. 1989-90 हे वर्ष असावे... शिवसेनेकडून मी व मनोहर जोशी व भाजपतर्फे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे व महादेव शिवणकर अशी फौज युतीच्या रूपात सत्ताधार्‍यांचा सामना करण्यासाठी उभी राहिली होती. अर्थातच, या युतीला आशीर्वाद होता, तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा!

शिवसेनेने शहरी भागातून आपल्या कामाची सुरुवात करून ग्रामीण भागाकडे लक्ष वळवले होते. पण, महाजन- मुंडे द्वयीने पायाला भिंगरी लावून राज्याच्या ग्रामीण भागात भाजपचा सामाजिक पाया विस्तारण्याचे खूप मोठे काम केले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कामांना सुरुवात करणारी ही जोडी मराठवाड्यात जिवलग मित्र म्हणून ओळखली जात होती. विशेष म्हणजे, महाजन कुटुंबाचाही गोपीनाथरावांवर पहिल्यापासूनच मोठा जीव होता.

भाजपचे संघटक वसंतराव भागवत यांनी, महाजन-मुंडे या दोन्ही तरुणांमधील प्रचंड क्षमता ओळखून, त्यांना वेळीच भाजपच्या संघटनात्मक कामाची मोठी जबाबदारी दिली आणि या दोघांनीही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत राज्याच्या राजकीय वर्तुळात अल्पावधीत नाव कोरले होते. अर्थातच, यात दोघांच्याही ऐंशी-नव्वदीच्या दशकातील प्रचंड मेहनतीचाही मोठा वाटा होता, याचा विशेष उल्लेख करावा लागेल. सभा जिंकायच्या कशा आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणायचे कसे, याचे बाळकडू विद्यार्थी परिषदेतच मिळाले असल्याने महाजन असो वा मुंडे, या दोघांना भाजपमध्ये आपले पाय रोवण्यास फारसा वेळ लागला नाही.

वंजारी समाजातील असूनही जनसंघ तसेच विद्यार्थी परिषदेमुळे मुंडेंचा शैक्षणिक व सामाजिक पाया भक्कम झाला होता. दिवसाचे सतरा-अठरा तास काम करण्याची जिद्द आणि बौद्धिक क्षमतेची उपजत देणगी यामुळे मुंडेंचा सुरू झालेला प्रवास केंद्रीय मंत्र्यापर्यंत पोहोचला... कदाचित ते महायुतीच्या राज्यात मुख्यमंत्रीही होऊ शकले असते... पण नियतीला ते मान्य नसावे.

सविस्तर वाचण्यासाठी पुढील स्लाइडला क्लिक करा...