आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालमलावरोध : काल, आज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारणत: सर्व 95% बालके जन्मानंतर पहिल्या 24 तासांत संडास करतात व उर्वरित 5% बालकांमध्ये नंतरच्या 24 तासांमध्ये संडास होते. पहिल्या 48 तासात बालकांनी संडास न केल्यास अशा बालकांमध्ये बालमलावरोध असण्याची दाट शक्यता असते. वयाच्या सहाव्या महिन्यांनंतर बालकाला आईच्या दुधाबरोबर वरच्या गोष्टी सुरू केल्या जातात. याला विनिंग असे म्हणतात. विनिंगच्या वेळी आतड्यांमध्ये बदल होतात व बालमलावरोध होण्याची शक्यता असते. काही बालकांना एनिमा किंवा संडास होण्याची औषधे दिली तर या रोगाची लक्षणे उशिरा कळतात व बाळाचे पोट फुगते.
लक्षणे : साधारणत: नवजात बालके दिवसातून 2 ते 7 वेळा संडास करतात व हे प्रमाण वयाच्या पहिल्या वर्षापर्यंत दिवसातून 1 ते 2 वेळा होते. जर बालक 2 ते 3 दिवस संडास करत नसेल तर त्यास बालमलावरोध असू शकतो. बाळाचे पोट वारंवार फुगते व पोटदुखीचा त्रास सुरू होतो. बाळाची भूक मंदावते व बाल निस्तेज होऊन जाते. बाळ उलटीही करू शकते. अशा बालकांचे वजन व उंचीची वाढही खंडित होऊन जाते. बाळाच्या पोटाला हात लावल्यास संडासचे दगड हाताला लागतात.
कारणे : मोठ्या आतड्यांची लांबी 1.5 मीटर असते. गॅगलिऑन पेशी व आतड्यांच्या नसा यांचे कार्य सुरळीत असेल तरच संडास व्यवस्थित मार्गक्रमित होऊ शकते. हिरस्प्रुंगज डिसिजन आजारात गॅगलिऑन पेशी नसतात व आतड्यांच्या नसाचे कार्य व्यवस्थित नसते. या पेशींची कमतरता संडासच्या जागेपासून एका ठराविक अंतरापर्यंत असू शकते. या लांबीनुसार या आजाराचे short segment
व long segment असे दोन प्रकार करण्यात आले आहेत. पेशी नसणारे आतडे बारीक व निकामी होऊन जाते व पेशी असणारे चांगले आतडे प्रचंड प्रमाणात फुगते व तेही हळूहळू निकामी होऊ लागते. आतड्यांचे स्राव वाढतात व बालकाला पाण्यासारखी पातळ संडास होते व आतड्यांना सूज येऊन बाळाला ताप येतो. यास Enterocolitis
असे म्हणतात. असे झाल्यास बाळ अत्यवस्थ होऊन जाते व बाळास अतिदक्षता विभागाची गरज असते.
रोगनिदान : 1) पोटाचा एक्स-रे : यात खराब झालेल्या आतड्यांमध्ये गॅस दिसत नाही व चांगले आतडे फुगलेले दिसतात. 2) सोनोग्राफी : यात खराब आतड्यांची हालचाल मंदावते व चांगले आतडे जास्त हालचाल करतात. 3)barium enema
दुधासारखे पांढरे औषध संडासच्या जागी enema
प्रमाणे टाकले जाते. यात चांगल्या व खराब आतड्यांमधील फरक स्पष्ट होतो व आजाराचा प्रकारही कळून जातो. 4) Anorectal nyometry
यात संडासच्या जागेचा दाब वाढलेला असतो.
उपचार : सुरुवातीला बाळाला Enema
देणे संडासच्या जागी गोळी ठेवणे व laxative
देणे हे सर्वसाधारण उपचार केले जातात. खाण्याच्या चुकीच्या सवयी बदलल्या जातात. या गोष्टीमुळे जर बालकांमध्ये फरक न पडल्यास शस्त्रक्रिया करणे अनिवार्य असते. पूर्वी या आजारात चार शस्त्रक्रिया कराव्या लागत होत्या. सुरुवातीला संडासच्या जागेचा तुकडा काढून रोगनिदान केले जात होते. नंतर दुस-या शस्त्रक्रियेत संडासची जागा पोटातून काढण्यात येत होती व चांगल्या आतड्यांची पारख करण्यासाठी आतड्यांचे वेगवेगळ्या भागातून तुकडे काढण्यात येत होते. तिस-या ऑपरेशनमध्ये चांगले आतडे संडासच्या जागी आणून जोडले जाते.चौथ्या ऑपरेशनमध्ये पोटावरची संडासची जागा बंद केली जाते. अत्याधुनिक उपचार पद्धतीमध्ये ऑपरेशन चालू असतानाच चांगल्या व खराब आतड्यांचे फ्रोझेन सेक्शन घेतले जातात व खराब आतडे काढण्यात येते. त्यामुळे चार शस्त्रक्रियांऐवजी एक किंवा दोन शस्त्रक्रियेमध्ये हा आजार बरा केला जाऊ शकतो. अचूक रोगनिदान व तातडीची शस्त्रक्रिया ही या आजाराशी लढण्याची गुरुकिल्ली आहे.