आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लहान मुलांचे स्थूलत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थूलत्व फक्त मोठ्या माणसातच असते. असे नाही तर पौगंडावस्थेत असते. तरुण पण, मध्यम वय, वृद्ध. अतिवृद्धही सर्व स्थूलतेचे शिकारी असतात. अगदी जन्मल्या अवस्थेत ही बाळे आपले स्थूलत्व दाखवतात. जशी ही बाळे वयानी वाढतात तसेच त्यांचे स्थूलत्व वाढते. मांड्या, दंड पोट-या अतिप्रमाणात चरबीमुळे वाढलेले असते. ही मुले थुलथुलीत, गुबगुबीत अशी दिसतात. लवकर थकतात. त्यांचा स्टॅमिना कमी असतो. सुखवस्तू घरातील मुले अशी असतात. या स्थूलत्वामुळे ही मुले सहज विविध आजाराचे बळी होतात.
स्थूलत्वाची कारणे : -
हे लहान मुलातील स्थूलत्वाची कारणे विविध गुणांनी घडलेली असतात. एक किंवा जास्त कारण एकत्रपणे कधी कधी आढळतात.
* वंशपरंपरा - जेनेटिक फॅक्टर हा स्थूलत्वामध्ये मुख्य दिसतो. पहिल्या पिढीतून दुस-या पिढीकडे व पुढे पुढे जात असतो. कुटुंबा-कुटुंबामध्ये हा सहज दिसतो.मुले,मुली, नातवंडे, पतवंडे असा हा कुटुंबात पसरतो. मुलीचे लग्न दुस-या कुटुंबात होते. मग त्यांची मुले स्थूल होतात.जर आई-वडील, बहीण -भाऊ स्थूल असतील तर मुले स्थूल असतात.
* आहार सवयी - जास्त प्रमाणात फास्ट फूड खाण्याची पद्धत आता नियमित होत आहे. ही निश्चित चिंतेची बाब आहे. चिप्स, गोड बेकरी फूड, पिझ्झा, बर्गर या शिवाय अनेक तळलेले खारे, गोड पदार्थ, हॉटेल जेवण, विविध मेजवान्या, विविध आकर्षक स्नॅक्स पदार्थ आणि विविध गोड पेय कोका, पेप्सी इत्यादी ही लहान मुले नेहमी खातात. भूक नसताना खाणे, टीव्ही समोर गेम्स खेळतानाही मुले खातात. नियमित वेळा सोडून अवेळी जास्त खातात मग अन्न पचन होत नाही. हे असे नेहमीच होते. त्यातल्या त्यात रात्री उशिरा अन्न खाणे हे अतिशय धोकादायक आहे. खूप मुलांना होमवर्क करताना व्हेपर्स, चकल्या, फरसाण इत्यादी खाण्याची सवय असते. हे अयोग्य आहे.
* कौटुंबिक, आर्थिक,सामाजिक परिस्थिती - गरीब कुटुंबातील मुले अतिउष्मांक अन्न खातात, पण काम म्हणजे अ‍ॅक्टिव्हिटी कमी असल्यामुळे मुलांचे वजन वाढते. श्रीमंत कुटुंबात तर तोंडातून मुलांच्या कॅडबरी, आइस्क्रीम शब्द निघाला तर त्यांना हाय कॅलरी फूड ताबडतोब मिळते. हे सर्व धोकादायक आहे.
* मैदानी खेळ व खेळाचा अभाव - बैठे जीवन मुलांना आवडते. कॉम्प्युटर गेम्स आवडतात, पण ग्राउंडवर जाऊन शरीराला खेळण्याच्या रूपात कष्ट द्यायला आवडत नाही. शरीराला कष्ट, काम कमी असेल तर उष्मांक खर्च होत नाहीत. पर्यायाने आळशीपणा वाढतो.
* औषधामुळे येणारे स्थूलत्व - याचे प्रयोग खूप कमी आहे. हार्मोन उपचार किंवा रासायनिक अव्यवस्था मेटॅबॉलिक आजार ही काही कारणे आहेत.
*मानसिक व्यवस्थापन कमी असणे - डिप्रेशन अति रागीट स्वभाव, जीवनातील कठीण परिस्थिती न हाताळल्या जाणे, कौटुंबिक, शारीरिक, मानसिक अत्याचार अशा विविध अवस्थेत मुले जास्त खातात. अयोग्य खातात.
लक्षणे : ही लहान मुले आकाराने मोठी असतात. त्यांच्या वयाच्या मानाने खूप मोठी वाटतात. त्यांच्या शारीरिक हालचाली कार्य खूप कमी असतात. बोजड, गुळगुळीत असल्याचा न्यूनगड या मुलांत दिसतो. आळशीपणा खूप असतो काम करणे खेळणे नसतेच खूप वजनामुळे थोडे काम किंवा थोडी धावपळ झाली तर ही मुले दमतात. श्वास घेणे अवघड होते. या मुलांच्या चेह-यावरचे हावभाव अयोग्य वाटतात. चेह-यावर बालपण दिसत नाही. रूक्ष वाटतात.

प्रतिबंधक उपाय
आहार फायबर युक्त आहार हे आदर्श उपचाराचा सोपा उपाय आहे. फळे हिरवा भाजीपाला विविध कडधान्य, विविध प्रकारात आवडेल असे घरचे जेवण शक्यतो घ्यावे. हॉटेल, धाबा येथील अन्न मुळीच देऊ नये. तळलेले नमकीन, गोड पदार्थ टाळावेत.बेकरी फुडमध्ये मैदा असतो. तो पचण्यास जड जातो. आरोग्यास हितकारी आहार घ्यावा. मुलांना आदर्श जेवणाबद्दल समजून सांगा व चांगल्या सवयी अगदी बाल्यावस्थेपासून लावा. आरोग्यदायी गोष्टी त्यांना समजून सांगा. फळे, कडधान्य, भाजीपाला कसा शरीराला आवश्यक आहे. हे समजावून सांगा. फास्ट फूडला मर्यादा घाला. व्यायाम, खेळ,पोहणे यात उत्साह मुलांना द्या. आसने प्राणायाम सुरुवातीचे हलके ध्यान अवस्था यांचे प्रशिक्षित तज्ज्ञाकडून धडे मुलांना द्यावेत.