आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child's Fault In Pittavessal : Causes And Salution

बालकांमधील पित्तनलिकेमधील दोष : कारणे व उपचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लाड नावाच्या शल्यचिकित्सकाने 1928 मध्ये पित्तनलिकेमधील दोषांसाठी पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली. कसाई नावाच्या शल्यचिकित्सकाने 1957 मध्ये पित्ताशय व पित्तनलिका अरुंद असणा-या बालकांमध्ये यकृताला छोटे आतडे जोडून या आजारावर सर्वात जास्त यशस्वी शस्त्रक्रियेचा शोध लावला. बालकांमध्ये पहिल्या दोन आठवड्यांमध्ये जवळपास सर्वच बालकांना कावीळ होते, की जी नैसर्गिकरीत्या कमी होऊन जाते.

फक्त 2 टक्के बालकांमध्ये कावीळ कायम राहते. त्याला (Pathological Jaundice) असे म्हणतात. या काविळीचे जन्मजात पित्तनलिका नसणे व पित्तनलिकेची गाठ ही प्रमुख कारणे आहेत. अशा आजारात 10 ते 20 टक्के बालकांमध्ये इतर जन्मजात व्याधी असू शकतात. आतड्यांना पीळ पडणे व पोटामधील अवयव उलटे असणे.
कारणे : गर्भावस्थेत चौथ्या आठवड्यात पित्तनलिका तयार होतात. परंतु पित्तनलिकेत जर रिकॅनॅलायझेशन झाले नाही तर हा आजार होतो. जन्मजात बालकांमधील पित्तवाहिन्यांना बाजूंच्या पेशींचा व्यवस्थित आधार मिळत नाही. गर्भावस्थेत Torch विषाणूंचे संक्रमण झाल्यास हा आजार होऊ शकतो.
परिणाम : यकृतामधील पित्त आतड्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे पित्त जमा राहून त्याचे विपरीत परिणाम सुरू होतात. यकृतामधील पेशी नाहीशी होऊन रक्तामधील काविळीचे प्रमाण हळूहळू वाढू लागते.
लक्षणे :
* बाळाचे अंग पिवळे पडणे व पिवळेपणा वाढणे.
*पिवळी लघवी होणे.
* संडास पांढरी (पित्त नसल्यामुळे) होणे.
* यकृताला सूज येणे.
*पित्ताशयाला सूज येणे.
*पोटामध्ये पाणी जमा होणे.
रोगनिदान :
* रक्तातील Direct Bilirubin चे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास अशा बालकांमध्ये त्वरित रोगनिदान करणे आवश्यक असते.
*रक्तातील Alkaline Phosphataseचे प्रमाण 1000 पेक्षा जास्त असल्यास अशा बालकांमध्ये जास्त धोका संभवतो.
* Tdrch Titre करून विषाणूंचा संसर्ग या आजाराचे कारण असल्याचा उलगडा करता येतो.
* सोनोग्राफीमध्ये यकृतामधील दोष व Choledochal cyst याचे निदान होऊ शकते.
*HIDA स्कॅन यात यकृत व पित्ताशयाचे पित्त बनवण्याच्या गतीचा उलगडा होऊ शकतो.
* लिव्हर बायोप्सी या तपासणीत सुईद्वारे यकृताचा तुकडा काढून रोगनिदान करण्यात येते. ही टेस्ट खात्रीपूर्वक रोगनिदान करू शकते.
धोके :
*Vitamins व Fatty Acids ची कमतरता बालकांना होऊ शकते.
* बालकाला वारंवार पित्तनलिकेचे इन्फेक्शन होऊ शकते, त्याला cholangitis असे म्हणतात.
* बालकाला Portal Hypertension होऊ शकते.
*उशिरा शस्त्रक्रिया केल्यास बालकाच्या जीवितास धोका असतो.
पाठपुरावा :
* बालकाची वाढ व्यवस्थित होणे.
* बालकाचा पिवळेपणा कमी होणे.
* लघवीमधील पिवळेपणा नाहीसा होणे.
* संडास पिवळी होणे.
* यकृत व प्लीहाची सूज कमी होणे.
* पोटातील पाणी कमी होणे.
* रक्ताचे रिपोर्ट सामान्य होणे.
ही सर्व बाळाच्या यशस्वी उपचारांची लक्षणे आहेत.


sandeep17580@gmail.com