आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता पाऊसपाण्याच्या... (रसिक, डॉ. पृथ्वीराज तौर)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसावर कविता लिहिली नाही, असा कवी विरळा असेल. पावसाच्या सगळ्या रूपांवर लिहूनही पावसाबद्दल सांगायचे शिल्लक राहतेच आणि म्हणून हजारो कवितांनंतरही पाऊसपाण्याची बात करणाऱ्या कविता निर्माण होत राहतात.

सृष्टीचे सगळे चैतन्य ‘पाऊस’ या एका शब्दात एकवटलेले आहे. त्याचे येणे वा न येणे, या दोन्ही बाबी मानवी चिंतनाचा विषय राहिल्या आहेत. मानवच नव्हे तर अवघी चराचर सृष्टी त्याची वाट पाहात असते. त्याच्यासाठी ऋचा आणि पर्जन्यसुक्ते गात असते. या आवाहनाची भाषा मात्र ज्याची त्याची निराळी असते.

मृग असेल किंवा आर्द्रा, आषाढ असेल किंवा श्रावण, अवर्षण असेल किंवा अतिवृष्टी, त्याचे रिमझिम येणे असेल किंवा धुंवाधार, तो रपरप येवो अथवा झायझुम, पावसाशिवाय धरित्रीला हिरवा रंग येत नाही, पाखरांच्या ओठांवर आनंदाची गाणी विलसत नाहीत. पावसावर कविता लिहिली नाही, असा कवी विरळा असेल. पावसाच्या सगळ्या रूपांवर लिहूनही पावसाबद्दल सांगायचे शिल्लक राहतेच आणि म्हणून हजारो कवितांनंतरही पाऊसपाण्याची बात करणाऱ्या कविता निर्माण होत राहतात. वाचक मनाला मोहवत राहतात.

‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही’, ‘एका पावसात दोघांनी भिजायचे’, ‘सरावन महिना आला की, माही झोपडी लडू लागते’ किंवा ‘येत्या पावसाळ्यात, बघ माझी आठवण येते का?’ या ओळी मराठी कवितेतील पावसाच्या विस्ताराची साक्ष देतात. भारतीय कवितेतील त्याची रूपे वाचणेही तेवढेच मोहक आहे. भिन्न भिन्न भारतीय भाषांतील, निरनिराळ्या वयोगटातील कवींनी शब्दात बांधलेला पाऊस दाद द्यावा, असाच आहे.
ढग
ढग
समुद्राचे सारंगी वाजवणारे भाट
जळतं क्षितिज हरळीसाठीची प्रार्थना
बियाण्याच्या कपाळावर
पावसाच्या संगीताचं चुंबन
धरतीला एकांताचा शोध
बिजाला मिळो हिरव्या इच्छा आणि प्रार्थना
धरतीच्या उदास होणाऱ्या बाळांसाठी
तऱ्हेतऱ्हेचे आकार, स्वप्नांचे फुलबाजे
बंदर, समुद्राची स्मारके
बदलत्या ऋतूमधल्या उदास वाऱ्याचा
शेवटचा अंतरा, गळणारं पान
पाऊस झडीच्या दिवसातलं.
देव (पंजाबी)
drprithvirajtaur@gmail.com
कवितांचा अनुवाद – डॉ. पृथ्वीराज तौर
पुढील स्लाइड्सवर वाचा, विविध भाषांतील अनुवादीत कविता..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...