आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचे हात हवेत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या मराठी सिनेमाला ऑस्करच्या शर्यतीत जाण्याचा जो सन्मान मिळतो आहे, ते निश्चितच आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. हा चित्रपट ऑस्कर स्पर्धेमध्ये कसा टिकून राहील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. हा चित्रपट सर्वसामान्यांच्या व्यथा मांडणारा आहे. तो काही विशिष्ट व्यक्तिरेखांवर केंद्रित नाही. लोकांना न्यायालयीन लढायांमध्ये कसा त्रास सहन करावा लागतो, त्यांना आपले आयुष्य कसे पणाला लावावे लागते, याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाला ऑस्कर मिळवून देण्यासाठी करावी लागणारी लढाई केवळ चित्रपटाच्या टीमने नव्हे तर सर्वसामान्यांनीही करावी लागेल. हा भारतीय चित्रपट आहे व विशेषत: मराठी मुलखातल्या लोकांना मला असे सांगायचे आहे की, खूप दिवसानंतर, ‘श्वास’ या मराठी चित्रपटानंतर पुन्हा एक मराठी चित्रपट ऑस्करसाठी जातोय. आपण आता रणांगणात उतरलेलो आहोत आणि हे युद्ध आपण जिंकलेच पाहिजे. यासाठी सर्वांनी कामाला लागण्याची गरज आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जो काही खर्च होणार आहे, त्याकरिता आमच्या टीमचे प्रयत्न अपुरे पडणार आहेत. त्यामुळे माझे व्यक्तिश: असे आवाहन आहे की, या चित्रपटाला आर्थिक मदत करावी. मी व्यक्तिश: आर्थिक मदत देणारच आहे. प्रत्येकाच्या मदतीने यश फार लांबचे नाही.
(कोर्ट चित्रपटातील नारायण कांबळे ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते व लेखक)