आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Column About 'jo Vada Kiya Vo...' By Dharmendrapratap Sing

जो वादा किया वो...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगीतकार रोशन यांना आपल्या कामाविषयी विलक्षण आत्मीयता होती. ते घरी असले तरी चोवीस तास कामातच गढलेले असत. त्यांची पत्नी इरा मात्र यामुळे कधी कधी नाराज होत. खरं तर इरा यांची अशी इच्छा होती की, इतर भारतीय स्त्रियांप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधून घरी येणाऱ्या नवऱ्याची आपण वाट पाहावी. पण रोशन घरूनच काम करत असल्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होत नव्हती. म्हणून इरा यांनी घरापासून लांब एक म्युझिक रुम शोधायला सुरुवातही केली. त्यांची ही धडपड पाहून रोशन गमतीने म्हणाले, ‘जर मी घराबाहेर गेलो तर तू खूप पस्तावशील.’ इराही त्यावर मिश्कीलपणे म्हणाल्या, ‘मला अजिबात पश्चात्ताप होणार नाही. म्युझिक रुमसाठी मला अशी जागा शोधायची आहे, की तुम्ही दुपारीही घरी येऊ शकणार नाही. मग मी संध्याकाळी खूप आतुरतेने तुमची वाट बघेन...’ इरा यांना अशी म्युझिक रुम तर मिळाली नाही, पण बोलाफुलाला गाठ पडली आणि इरा यांना आयुष्यभरासाठी ते शब्द जिव्हारी लागले.
रोशन यांना मृत्यूची चाहूल कदाचित अगोदरच लागली असावी. त्यांच्या घराजवळून एखादी प्रेतयात्रा निघाली असेल तर ते इराला म्हणत, ‘एक दिवस मीदेखील असाच जाईन, तेव्हा तू बाल्कनीत उभी राहून अशीच बघत बसशील...’ रोशन यांचे असे अभद्र बोल ऐकून इरा साहजिकच खूप अस्वस्थ होत. त्यांनी एका ज्योतिषालाही त्याबाबत विचारले. ज्योतिषाने रोशन यांच्या कुंडलीत मृत्यूयाेग असल्याचे सांगून त्यासाठी पूजा करण्याचा सल्ला दिला. इरा यांनी त्यानुसार विधिवत पूजा केली आणि रोशन यांच्या नकळत सढळ हस्ते दान करून ब्राह्मणालाही दान दिले. रोशन यांना जेव्हा हे समजले, तेव्हा ते हसून म्हणाले, ‘अरे पागल, मौत और जिंदगी भला इंसान के हाथ में है क्या? ईश्वर हमारी सांसें गिनकर भेजता है... वहां से जितनी सांसे दी जाती है, हम-आप उससे एक भी सांस ज्यादा नहीं ले सकते। वैसे भी, मृत्यू योग तो हमारे जन्म से ही आरंभ हो जाता है न!’
१६ नोव्हेंबर १९६७...दिवसभर रोशन चांगल्या मूडमध्ये होते. रात्री ‘ज्वेलथीप’चा प्रिमियर होता. योगायोगाने निर्माता-दिग्दर्शक हरि वालिया यांनीही त्याच वेळी त्यांना घरी बोलावले. म्हणून धाकटा मुलगा राजू याला प्रिमियरला पाठवायचे ठरवले. रोशन नवीन कपडे घालून तयार झाले आणि राजूच्या शेजारी उभे राहात म्हणाले, ‘अरे, राजू तर माझ्या बरोबरीला आला आहे. आता मला कशाची चिंता नाही. माझे दोन्ही मुलगे आता मोठे झाले आहेत.’ त्यांनी कारची चावी राजूला दिली आणि स्वत: इरासह टॅक्सीने हरि वालिया यांच्याकडे निघाले. रस्त्यात त्यांनी इरा यांना गाणे म्हणण्यास सांगितले. इरा यांनी ‘ताजमह़ल’मधील ‘जो वादा किया वो...’ म्हणायला सुरुवात केली, तेव्हा रोशन नाराजीने म्हणाले, ‘तू नेहमी हेच गाणे ऐकवतेस...’ त्यानंतर ते स्वत:च काहीतरी गुणगुणू लागले. ते जेव्हा हरि वालिया यांच्या घरी पोहोचले, तेव्हा तिथे बरेच लोक उपस्थित होते. रोशन एका वितरकांशी गप्पा मारण्यात दंग झाले. अचानक ते कोसळले आणि बेशुद्ध झाले. इरा धावत पतीजवळ गेल्या. त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण इरा यांना वाट बघण्यासाठी एकटीला सोडून रोशन कायमचे खूप दूर निघून गेले होते. त्यांनी आपला शब्द खरा केला होता...
dpsingh@dbcorp.in