आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीत नापास; लिहिला संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजय लोमटे याने लिहिलेल्या ग्रंथामध्ये ६८ अध्याय असून, त्यामध्ये महापुरुष- देवतांना वंदना, ज्ञानाचे महत्त्व सांगणारा अध्याय आहे. नावात काय असते, त्यापेक्षा कर्तृत्व कसे श्रेष्ठ आहे, बुद्धीशिवाय जग जिंकणे कसे अशक्य आहे, याचा विचार मांडताना महापुरुषांच्या नावाखाली खाेटेपण कसे मिरविले जाते, याचा समाचार घेण्यात आला आहे. अंधश्रद्धा, बुवाबाजीतून समाजाला कसे ठकविले जाते, परिवर्तन सृष्टीचा, निसर्गाचा नियम कसा व्यापक आहे, रक्तदान कसे श्रेष्ठ मानले गेले आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याचे विवेचन या ग्रंथातून करण्यात आलेले आहे.

..तरी लिखाण सोडले नाही
नववीतअसतानामला संस्कृतमधून लिहिण्याची सवय लागली. माझ्या सततच्या संस्कृत वाचनामुळे अन्य विषयांकडे दुर्लक्ष झाले आणि बारावीत नापास झालो. मात्र, संस्कृत लिखाण सोडले नाही. पुढेही विषयानुसार संस्कृतमधून लिखाण करीत राहणार आहे. अजय लोमटे, मलकापूर,उस्मानाबाद

उस्मानाबादच्या शेतकऱ्याचा २१ वर्षीय अजय लाेमटे याने लिहिलेला ३०० श्लोकांचा संस्कृत ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्याचा हा ८० पानी ग्रंथ प्राचीन भाकडकथा नसून, तर वर्तमान पिढीला दिशा देणारा आहे.

कुटुंबात पांडित्य परंपरा नाही, पण शाळेत असताना त्याने छत्रपती संभाजी महाराजांनी १३ व्या वर्षी वेगवेगळ्या भाषेत ग्रंथ लिहिल्याचे कळले अाणि अजयने लिखाणाचा चंगच बांधला.
अाठवीपासूनच त्याने संस्कृत विषयात नैपुण्य मिळविण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांपूर्वी त्याने संस्कृतमधून स्वरचित ग्रंथनिर्मिती सुरू केली. या ग्रंथातून त्याने निव्वळ जुन्या भाकडकथा किंवा निव्वळ उपदेशाचे डोस देता त्याने वर्तमान पिढीला रुचेल-पचेल अशा शब्दांत प्रबोधन केले आहे. ३०० श्लोकांमध्ये मानवाने कसे वागावे, जीवन कसे जगावे, या साध्या-सरळ तत्त्वांचा मार्ग सांगितला आहे. खोटेपणा, दांभिकपणा, अंधश्रद्धा, बुवाबाजी, महापुरुषांच्या जयंत्या आणि त्यामागचा हेतू, अशा विषयांवर संस्कृत श्लोक आणि त्याखाली मराठीत अर्थ दिला अाहे. त्याचा हा ‘अजयत्रिशती’ ग्रंथ पुण्यातील एका प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात येणार आहे. त्याच्या या ग्रंथासाठी खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजी महाराज यांच्यासह अनेक नामवंत साहित्यिकांनी अभिप्राय दिला आहे. ताे म्हणताे की, मला संस्कृत विषयाची प्रचंड गोडी लागली होती. मात्र, कुटंुबाला ते मान्य नव्हते. मला घर सोडून येडशीच्या जंगलात जावे लागले. ग्रंथ लिखाणानंतर माझे खऱ्या अर्थाने समाधान झाले.