Home | Magazine | Madhurima | combination-traditional-and-modernization

पारंपरिकता आणि आधुनिकतेचा संगम

अर्चना पिसू, औरंगाबाद | Update - Jun 10, 2011, 03:00 PM IST

लग्नानंतर आयुष्य वेगळं वळण घेतं. माहेरच्या वाटेतल्या ओळखीच्या खुणा इथं सासरी कुठेच सापडत नाहीत....

  • combination-traditional-and-modernization

    लग्नानंतर आयुष्य वेगळं वळण घेतं. माहेरच्या वाटेतल्या ओळखीच्या खुणा इथं सासरी कुठेच सापडत नाहीत. सासरची ही वाट निराळी. यावर भेटणाºया व्यक्ती वेगळ्या. तरी सुरुवातीचे गुलाबी स्वप्नांचे सप्तरंगी दिवस आठवले की, आजही मन ताजंतवानं होतं. तेव्हा नुकताच सुखाचा कोश विणायला सुरुवात झाली होती. सासरची माणसं, त्यांचे स्वभाव यांची ओळख हळूहळू होत होती. लग्नाला जेमतेम सहा महिनेच झाले होते. वीस मे, सासरी आल्यावरचा पहिला वाढदिवस!
    सकाळी नवºयाच्या शुभेच्छांची साद कानावर आली आणि मी भानावर आले. घड्याळाकडे लक्ष गेले. आज नेहमीपेक्षा जरा उशीरच झाला उठायला म्हणून मी घाईनं खोलीबाहेर आले. घरातली झाडझूड करावी म्हणून कुंचा हातात घेतला तेव्हा सासूबाई म्हणाल्या, ‘‘अर्चना, चहा ठेवलाय तुझा. आज तू कुठलंही काम करायचं नाही, तुझा वाढदिवस ना!’’ मी चकितच झाले. बागेतल्या मोगºयाची फुलं देत त्यांनी शुभेच्छा दिल्या. हॉलमध्ये पेपर वाचत आयत्या चहाचा आनंद घेतला. तेवढ्यात पप्पांचा फोन आला. त्यांनी फोनवरून आशीर्वाद दिला. आईशी तर फोनवरून बोलवेना. शेवटी भाऊच म्हणाला, ‘‘आज नको रडूस.’’ त्यांच्याशी बोलताना मोहरच्या गारव्यानं डोेळे पाणावलेच. भानावर आले ते सासºयांच्या आशीर्वादानं! ‘जीवेत् शरद: शतम्’ म्हणून त्यांनी आशीर्वाद दिले. सकाळी प्रत्येकाचे-मैत्रिणी, नातेवाईक यांचे फोन अटेंड करण्यात बराच वेळ गेला. तोपर्यंत सासूबार्इंनी स्वयंपाकही केला होता. मे महिन्यात वाढदिवस असल्याने आंब्याच्या रसाचा बेत होता. नवºयाने सुटी घेतली नव्हती. त्यामुळे स्वारी लवकर जेवण आटोपून आॅफिसात गेली. आमच्या जेवणाच्या वेळेपर्यंत माझी नणंद आणि त्यांची मुलगी केक घेऊन आल्या. केक कापून होणारा तो माझा पहिलाच वाढदिवस. अबोलीचा उत्साह पाहून गंमत वाटली. जयुताई, अबोली यांच्याबरोबर गप्पांमध्ये दिवस मजेत सरला. संध्याकाळी माझ्या बहिणी कांचन, वर्षा, भाऊ अमोल, योगेश, यशवंत हे सारे आले. आमच्या सासरच्या खेळकर वातावरणानं त्यांचा संकोच दूर झाला. घरातल्यांनी त्यांचा यथोचित पाहुणचार केला.
    नवरा आॅफिसातून आल्यावर सासूबार्इंनी मला औक्षण केले. तोंडभरून आशीर्वाद दिला. हवी ती वस्तू आणण्यासाठी सासºयांनी पैसे दिले. नंतर सासूबाई म्हणाल्या, ‘आता तुम्ही दोघंही हॉटेलात जेवायला जा आणि तुमच्या-तुमच्या पद्धतीने हवा तसा वाढदिवस साजरा करा.’ हे तर माझ्यासाठी अनपेक्षितच होतं.

Trending