आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कम्बाइंड बायोटेक्नॉलॉजी एंट्रन्स एक्झामिनेशन : 2013-2014

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशांतर्गत विविध कृषी विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असणा-या एमएस्सी (बायोटेक्नॉलॉजी), एमएस्सी (कृषी), एमटेक (बायोटेक्नॉलॉजी), एमव्हीएस्सी यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी जवाहलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीतर्फे राष्ट्रीय स्तरावर 2013-2014 या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून अर्ज मागविणात येत आहेत.

अभ्यासक्रम व आवश्यक पात्रता : एमएस्सी बायोटेक्नॉलॉजी : अर्जदारांनी जीवशास्त्र, कृषी, पशुवैद्यक, मत्स्यविज्ञान, औषधीशास्त्र, तंत्रज्ञान वा अभियांत्रिकी, बीएस्सी, एमबीबीएस अथवा दंतवैद्यक विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

एमएस्सी - कृषी व पशुविज्ञान : अर्जदारांनी कृषी वा पशुवैद्यक - पशुविज्ञान विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
एमटेक - बायोटेक्नॉलॉजी : अर्जदारांनी केमिकल इंजिनिअरिंग, बायोकेमिकल इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, रसायनशास्त्र, केमिकल टेक्नॉलॉजी, फार्मसी, लाइफ सायन्स, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र यासारख्या विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
आवश्यक सूचना : अर्जदार विद्यार्थ्यांची त्यांच्यावर नमूद केलेल्या पात्रता परीक्षा कमीत कमी 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना 21 मे 2013 रोजी घेण्यात येणाºया राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश पात्रता परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही प्रवेश पात्रता परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या www.jnu.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 260 रु.चा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या नावे व नवी दिल्ली येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट विनंती संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.

अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जदारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून 400 रु.चा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेली व आवश्यक ती कागदपत्रे आणि तपशिलासह असणारे अर्ज सेक्शन ऑफिसर (अ‍ॅडमिशन्स), रूम नं. 28, अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली 110067 या पत्त्यावर 23 मार्च 2013 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.