आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खास महिलांसाठी... आला श्रावण श्रावण, आला पंचमीचा सण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आला श्रावण श्रावण, आला पंचमीचा सण
धरती ल्याली हिरवं लेणं, गाऊ आनंदाचं गाणं


असं म्हणत श्रावण महिना आम्हा महिलावर्गाची धांदल उडवितो. हिरवाईनं नटलेला सारा आसमंत जणू नवचैतन्यानं ओतप्रोत भरलेला असताना श्रावणातील सणांची भाऊगर्दी अधिकच विलोभनीय वाटते. नागपंचमी हा खास स्त्रियांचा सण. शहरात राहणा-यांना या सणाचं महत्त्व अगदी घरातल्या घरात नागपूजन करण्यापुरतं मर्यादित असलं तरी ग्रामीण भागात याची अनिवार ओढ वाटणा-या लेकीसुना अजूनही पंचमीकडे डोळे लावून बसलेल्या असतात. नव्या बांगड्यांची किणकिण, नवीन पातळाचा धुंद कोरा करकरीत वास घेत झोक्यावर उंचउंच झोके घेण्यातली मजा काही औरच असते.


यानिमित्ताने मला लहानपणची पंचमी आठवली अन् मी भूतकाळात रमून गेले. सणावारांची मजा खरंच खेड्यातच आहे. लोकसंस्कृतीशी जवळून नाते जोडायची संधी या सणावारातून मिळते. माझं बालपण खेड्यातच गेलेलं. आमची पंचमी आषाढी एकादशीच्या दुस-या दिवसापासून सुरू व्हायची. संध्याकाळी आठ वाजले की गल्लीत सा-या बायकांची एकच धांदल उडायची. भराभर स्वयंपाक उरकून लहानथोरांची जेवणं आटोपून प्रत्येकीला फेर धरायला जायची ओढ असायची. आम्ही पोरीसोरी तोपर्यंत लहान फेर धरून गाणं सुरू करायचो. म्हणजे गाण्याचा आवाज ऐकून सा-या जणी लगबगीनं फेर धरायला जमायच्या.