आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षांच्या सर्दीच्या त्रासातून छोटी रेवती मुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझी मुलगी रेवती हिला वयाच्या दुसर्‍या वर्षांपासून सर्दीचा त्रास होता. सर्दीमध्ये शिंका येणे, नाक वाहणे, सुरुवातीला नाकाला पातळ व नंतर घट्ट, पिवळे पाणी येणे, नाक चोंदणे हा त्रास होता. त्यानंतर वयाच्या तिसर्‍या वर्षापासून सर्दीसोबतच खोकला येणे, धाप भरणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे, भूक कमी होणे हा त्रास सुरू झाला. हा त्रास हिवाळ्यामध्ये, केळी खाल्ल्यानंतर, थंड पाणी पिल्यानंतर, आइसक्रीम खाल्ल्यानंतर रात्रीचा जास्त वाढायचा. जेव्हा तिला वरील त्रास व्हायचा तेव्हा प्रत्येक वेळी दवाखान्यात नेऊन उपचार करावे लागायचे. त्याशिवाय त्रास कमी नाही व्हायचा. बर्‍याच वेळा त्रास रात्रीचा जास्त होत असल्याने रात्री-अपरात्री तिला दवाखान्यात अ‍ॅडमिट करावे लागायचे. सहसा रात्री दवाखाने बंद असल्यामुळे दोन ते तीन दवाखाने फिरल्यावर एखादा मोठा सर्वसोयींनी युक्त दवाखाना उघडा भेटायचा. अशा वेळी दवाखान्याचा होणारा खर्च आम्हा मध्यमवर्गीयांना परवडणारा नव्हता, पण नाइलाजाने हा खर्च करणे गरजेचे होते. शेवटी एका बालरोगतज्ज्ञाने तिला बाल दमा आहे, असे रोगनिदान केले आणि आमची व्यवस्थित औषधोपचार पद्धती सुरू झाली. डाक्टरांच्या औषधोपचार पद्धतीने तिला औषध चालू असेपर्यंत खूप चांगला फरक पडला; पण जेव्हा औषध संपायचे व काही दिवस औषध बंद असायचे, तेव्हा लगेच त्रास पूर्ववत चालू व्हायचा. शेवटी आम्ही दुसर्‍या डाक्टरांना दाखवले, तेव्हा मात्र पहिल्यापेक्षा जास्त फरक पडला होता, कारण तिला तोंडावाटे औषध श्वसन करून फुप्फुसांपर्यंत पोहोचावे यासाठी पंप चालू केला. शेवटी हेही औषध व पंप जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंतच तिला बरे वाटायचे आणि काही दिवसांनी परत त्रास व्हायचा. म्हणजे आजार हा फक्त तात्पुरताच बरा व्हायचा व परत सुरू व्हायचा. या सर्व कटकटींमुळे आम्ही त्रस्त झालो होतो. शेवटी एका शेजारील व्यक्तीने आम्हाला होमिओपॅथिक औषधोपचार घेण्याचा सल्ला दिला आणि शेवटचा पर्याय म्हणून आम्ही होमिओपॅथिक औषध चालू केले की, जेणेकरून आमची मुलगी या आजारापासून मुक्त होईल किंवा हा आजार कायमस्वरूपी बरा होईल.
रेवतीच्या वयाच्या सहाव्या वर्षी आम्ही होमिओपॅथिक औषधोपचार सुरू केले. एक वर्ष नियमित औषधोपचार घेतल्यानंतर तिच्यामध्ये खूप चांगला फरक पडला. आता ती थंड वातावरणात फिरू शकते. आता ती केळी खाऊ शकते, धावू-पळू शकते, वातावरणातील बदल सहन करू शकते. तिला कधीतरी थोड्याशा सर्दीशिवाय इतर काहीच त्रास होत नाही. गेल्या दीड ते दोन वर्षापासून कधीतरी एकदा सहा महिन्यांतून तिला सर्दीसाठी औषधाची गरज पडते. आता ती नऊ वर्षाची आहे. आजार नाहीसा झाल्यामुळे ती अभ्यासपण व्यवस्थित करू शकते. तिचे अभ्यासात लक्षही लागते. तिची शाळेतील अभ्यासाची प्रगति समाधानकारक आहे. हे सर्व होमिओपॅथिक औषधोपचार पद्धतीमुळेच शक्य झाले. तिच्या वयाच्या तिसर्‍याच वर्षी जर आम्ही होमिओपॅथिक औषधोपचार सुरू केले असते, तर आणखी तिच्यात यापेक्षाही हमखास चांगला फरक पडला असता. असो आम्हाला उशीर झाला, पण वाचकांनी लक्षात ठेवावे की तुम्ही उशीर करू नका. आम्हाला वेळेवर मार्गदर्शन भेटले नाही म्हणून उशीर झाला. तुम्हाला हा लेख उपयोगी पडावा हीच अपेक्षा. होमिओपॅथीचे मनापासून धन्यवाद आणि आभार.
श्री. सुनील उपाध्याय
मो. 8605034984