आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (सीएलएटी) 2013.

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रायपूर येथे उपलब्ध असणा-या कायदा विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या 2013-14 या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता
* पदवी अभ्यासक्रम : अर्जदार विद्यार्थ्यांनी 10+2 अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी 45%) उत्तीर्ण केलेली असावी.
* वयोमर्यादा : त्यांचे वय 20 वर्षांहून अधिक नसावे.
* पदव्युत्तर अभ्यासक्रम : अर्जदारांनी कायदा विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 55% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी 55%) उत्तीर्ण केलेली असावी.
* विशेष सूचना : जे विद्यार्थी यंदा वर नमूद केलेल्या पात्रता परीक्षेला बसले असतील तेसुद्धा या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
* निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर 12 मे 2013 रोजी घेण्यात येईल.
अर्जदारांची पात्रता परीक्षेतील टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांक या आधारे त्यांना बंगळुरू, हैदराबाद, भोपाळ, कोलकाता, जोधपूर, रायपूर, गांधीनगर, लखनऊ, पटियाला, पाटणा, कोची, रांची व गुवाहाटी येथील केंद्रीय कायदा विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणा-या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येईल.
*अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक स्टेट बँक ऑ फ इंडियाच्या निर्धारित शाखांमध्ये 3000 रु. रोखीने भरल्यास उपलब्ध होईल.
अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 3100 रु.चा रजिस्ट्रार, एचएनएलय, सीएलएटी अकाउंट, रायपूर यांच्या नावे असणारा व रायपूर येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह पाठवावा.
* अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या दूरध्वनी क्र. 0771-3057618 वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या www.ciat.ac.in या संकेतस्थळाला भेटा.
* अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज कन्व्हेयर, सीएलएटी-2013, हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पोस्ट उपरवारा, आभानपूर, नया रायपूर, रायपूर-493661 (छत्तीसगड) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2013.
ज्या विद्यार्थ्यांना कायदा क्षेत्रात पदवी व पदव्युत्तर पात्रतेसह आपले करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमांचा विचार करावा.

dattatraya.ambulkar@gmail.com