आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Competative Examination : Company Secreatary Syllabus

स्पर्धा परीक्षा: कंपनी सेक्रेटरीविषयक अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे कंपनी सचिव अभ्यासक्रमांतर्गत असणा-या मूलभूत अभ्यासक्रम व अंमलबजावणीविषयक अभ्यासक्रमांच्या प्रस्तावित सत्रामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत-
* स्वरूप व तपशील : वरील अभ्यासक्रम पत्रव्यवहाराद्वारे वा दूरस्थ शिक्षणाद्वारे करता येऊ शकतो. याशिवाय अभ्यासक्रमासाठी इन्स्टिट्यूटच्या विविध केंद्रांवर वैयक्तिक वा मौखक मार्गदर्शनाची पण सोय आहे.
अभ्यासक्रम व पात्रता :
* मूलभूत अभ्यासक्रम : अर्जदारांनी 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
* अभ्यासक्रम : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर वा कंपनी सेक्रेटरीविषयक मूलभूत अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले असावेत अथवा त्यांनी आयसीएआयसीएमएचा
मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा किंवा आयसीएआयची सीपीटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
* अभ्यासक्रमाचा पाठ्यक्रम व प्रवेश प्रक्रिया : वरील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश संपूर्ण वर्षभर खुला असून, अभ्यासक्रमासाठीची परीक्षा वर्षातून दोनदा म्हणजेच दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यांमध्ये घेण्यात येईल.
* अर्ज व माहितीपत्रक : अर्ज घरपोच हवे असल्यास 550 रु.च्या दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय, असणारा डिमांड ड्राफ्ट अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
ल्ल अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या दूरध्वनी क्र. 011-4150444 वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिट्यूटच्या www.icsi.edu
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ल्ल अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज संचालक (विद्यार्थी सेवा) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, सी-37, सेक्टर-92, नोएडा-201301 या पत्त्यावर 30 सप्टेंबर 2013 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था-अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व आयएएस पूर्व प्रशिक्षण संस्था, नाशिक येथे लोकसेवा आयोगातर्फे आयएएस वा तत्सम प्रशासन सेवांसाठी निवडीसाठी घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व तयारीसाठीच्या मार्गदर्शनपर अभ्यासक्रमासाठी पात्र उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
ल्ल जागांची संख्या व तपशील : यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई येथे उपलब्ध जागांची संख्या 100+10 (अल्पसंख्यांक) तर आयएएस पूर्व मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथील संख्या 60 आहे.
ल्ल आवश्यक पात्रता : अर्जदार महाराष्ट्राचे अधिवासी असावेत व ते कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत.
ल्ल वयोमर्यादा : अर्जदारांचे वय 1 ऑगस्ट 2014 रोजी 30 वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट अनुसूचित जाती, जमातींच्या उमेदवारांसाठी 5 वर्षांनी तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षांनी शिथिलक्षम.
* अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून 300 रु.चा (राखीव गटातील उमेदवारांनी 150 रु.चा) डायरेक्टर एसआयएसी, मुंबई यांच्या नावे असणारा व मुंबई येथे देय, डिमांडड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
ल्ल निवड प्रक्रिया : पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा 17 नोव्हेंबर, 2013 रोजी घेण्यात येईल. या निवड परीक्षेतील गुणांकानुसार त्यांना संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.
* अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबईच्या दूरध्वनी क्र. 022-22070942 वर संपर्क साधावा. अथवा संस्थेच्या www.siac.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
* अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांडड्राफ्टसह असणारे अर्ज राज्य प्रशासकीय शिक्षण संस्था, हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस समोर, मुंबई 400001 या पत्त्यावर पाठविण्याची तारीख 1 ऑक्टोबर 2013.
मध्य रेल्वेत महिला खेळाडूंसाठी
(आरटी), पदासाठी विशेष संधी
मध्य रेल्वेत महिला खेळाडूंसाठी खालीलप्रमाणे विशेष संधी उपलब्ध आहेत जागांची संख्या : एकूण उपलब्ध जागा 14.
*आवश्यक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावा व त्यांनी हॉकी, कबड्डी, नेमबाजी, हॉकी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, हॉकी, भारोत्तोलन, यासारख्या क्रीडा क्षेत्रात राज्य वा राष्ट्रीय स्तरावरील विशेष नैपुण्य प्राप्त केलेले असावे.
* वयोमर्यादा : 24 वर्षे राखीव गटातील उमेदवारांसठी शिथिलक्षम.
*निवडक प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना क्रीडा नैपुण्य चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल व त्यानुसार त्यांची निवड करण्यात येईल.
* वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या उमेदवारांना मध्य रेल्वेमध्ये दरमहा 5200-20200+2800 या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना रेल्वेच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदे पण देय असतील.
* अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून 100 रु.चा ‘असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (आरटी), रेल्वे रिक्रुटमेंट सेल, सेंट्रल रेल्वे, मुंबई’ यांच्या नावे असणारी इंडियन पोस्टल ऑर्डर पाठविणे आवश्यक.
* अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 24 ते 30 ऑगस्ट 2013 च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी.
* पत्ता व शेवटची तारीख : आवश्यक ते कागदपत्र, तपशील आणि पोस्टल ऑर्डरसह असणारे अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (आरटी), चीफ पर्सोनेल ऑफिसर्स ऑफिस, जनरल मॅनेजर्स, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई 400001 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2013.