आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Competative Examination : Dairy Technology Diploma

स्पर्धापरीक्षा: दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञानातील पदविका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र सरकारच्या दुग्ध व्यवसाय संचालनालयांतर्गत उपलब्ध असणा-या दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान या विषयातील पदविका अभ्यासक्रमाच्या 2013-2014 या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


* आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसह व कमीतकमी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
* विशेष सूचना : गुणांच्या टक्केवारीच्या संदर्भातील वर नमूद केल्याप्रमाणे असणारी अट राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी 45% पर्यंत शिथिलक्षम आहे.
* अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक 300 रु. रोखीने (राखीव गटातील उमेदवारांसाठी 150 रु.) भरल्यास प्राचार्य, दुग्धविकास विज्ञान संस्था, आरे कॉलनी, मुंबई अथवा पशुविज्ञान महाविद्यालय, शिरवळ (जि. सातारा), परभणी, उदगीर व दुग्धव्यवसाय महाविद्यालय, पुसद (जि. यवतमाळ) येथे मिळू शकेल.
अर्ज व माहिती पत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या विद्यार्थ्यांनी 350 रु.चा (राखीव गटातील विद्यार्थ्यांनी 200 रु.चा) पोस्टल ऑर्डर विनंती अर्जासह प्राचार्य, डेअरी विज्ञान संस्था, आरे, मुंबई यांच्याकडे पाठवावा.
* निवड पद्धती : अर्जदार विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे वरील पदविका अभ्यासक्रमासाठी संबंधित महाविद्यालयात प्रवेश देण्यात येईल.
* अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध विकास विभागाच्या दूरध्वनी क्र. 022-29272522 वर संपर्क साधावा अथवा Rrinuipaldsi@gmail.com येथे ई-मेलने विचारणा करावी.
* अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज प्रिंन्सिपॉल, डेअरी सायन्स इन्स्टिट्यूट, आरे कॉलनी, आरे, गोरेगाव (पूर्व), मुंबई-400065 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2013.


महिलांसाठी विशेष इंजिनिअरिंग अभ्यासक्रम
इंदिरा गांधी दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर वुमेनतर्फे खास विद्यार्थिनींसाठी उपलब्ध असणा-या इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
* उपलब्ध पदवी अभ्यासक्रम : बीटेक कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅँड इंजिनिअरिंग, बीटेक, मेकॅनिकल अ‍ॅँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग व बीटेक इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी.
* आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थिनींनी 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित व विज्ञान विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी.
* उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम : मास्टर इन कॉम्प्युटर अप्लिकेशन, एमटेक, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅँड कम्युनिकेशन, एमटेक इन्फर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट, एमटेक, डिझाइन व एमटेक रोबोटिक्स अ‍ॅँड अ‍ॅटोमेशन.
* आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थिनींनी संबंधित इंजिनिअरिंग वा तंत्रज्ञान विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
वर नमूद केलेल्या गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी 5%नी शिथिलक्षम आहे.
* अर्ज व माहिती पत्रक : अर्ज व माहिती पत्रक घरपोच हवे असल्यास 500 रु.चा रजिस्ट्रार आयजीडीटीयू यांच्या नावे असणारा व दिल्ली येते देय असणारा डिमांडड्राफ्ट विनंतीअर्जासह पाठवावा.
* अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहती व तपशिलासाठी इंदिरा गांधी दिल्ली, टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर वुमेनच्या www.igit.ac.in अथवा www.ipu.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
* अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज दि रजिस्ट्रार, इंदिरा गांधी, दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर वुमेन, काश्मिरी गेट, दिल्ली-110006 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2013.


आयुर्विज्ञान संस्था-लखनऊ येथील नर्सिंग अभ्यासक्रम
संजय गांधी पदव्युत्तर आयुर्विज्ञान संस्था व नर्सिंग कॉलेज, लखनऊ येथे उपलब्ध असणा-या चार वर्षीय बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक महिला उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे.
* आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार महिला उमेदवारांनी 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा विज्ञान विषयांसह उत्तीर्ण असावी.
* निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा निर्धारित परीक्षा केंद्रांवर 21 जुलै 2013 रोजी घेण्यात येईल.
त्यानंतर अर्जदार विद्यार्थ्यांनी बारावीतील गुणांची टक्केवारी व लेखी निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांची वरील अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
* अर्ज व माहिती पत्रक : अर्ज व माहिती पत्रक घरपोच हवे असल्यास 1000 रु.चा डायरेक्टर, एसजीपीजीआयएमएस अकॅडमिक अकाउंट, लखनऊ यांच्या नावे असणारा व स्टेट बँक ऑफ इंडिया एसजीपीजीआय ब्रँच कोड नं. 7789 येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह इन्स्टिट्यूटच्या कार्यालयात पाठवावा.
* अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संजय गांधी पदव्युत्तर आयुर्विज्ञान संस्था व नर्सिंग कॉलेज, लखनऊच्या दूरद्वनी क्र. 2668004 वर या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या www.sgpgi.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
* अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज संजय गांधी पदव्युत्तर आयुर्विज्ञान संस्था व नर्सिंग कॉलेज,रायबरेली मार्ग, लखनऊ 226014 (उप्र.) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2013.