आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Competative Examination : Forest Research Institute Post Graduate Degree

स्पर्धा परीक्षा : फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट पदव्युत्तर अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डेहराडून येथे उपलब्ध असणा-या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
* एमएस्सी फॉरेस्ट्री : अर्जदारांनी गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र किंवा फॉरेस्ट्रीमधील बीएस्सी पदवी घेतलेली असावी.
* एमएस्सी वुड सायन्स व टेक्नॉलॉजी : अर्जदारांनी विज्ञान, कृषी विज्ञान, वनस्पतिशास्त्र या विषयांसह अथवा फॉरेस्ट्रीमधील बीएस्सी पदवी घेतलेली असावी.
*एमएस्सी एन्व्हायर्नमेंटल सायन्स : अर्जदारांनी विज्ञान, कृषी विज्ञान अथवा फॉरेस्ट्रीमधील बीएस्सी किंवा पर्यावरण विज्ञान विषयातील बीई/ बीटेक पात्रता पूर्ण केलेली असावी.
*विशेष सूचना : वरील प्रत्येक अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या 3-3 प्रत्येकी 38 असून, त्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असणे आवश्यक आहे.
*निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर 12 मे 2013 रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व लेखी परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.
*अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून 1200 रु.चा रजिस्ट्रार, एफआरआय (डीम्ड) युनिव्हर्सिटीच्या नावे असणारा व डेहराडून येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
*अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या दूरध्वनी क्र. 0135-2751826 वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या http://fri.icfae.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
*अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज रजिस्ट्रार, फॉरेस्ट रिसर्च युनिव्हर्सिटी, एक्सकॉन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड, ई-2/5 दुसरा माळा, मालवीयनगर, नवी दिल्ली-110017 या पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2013.
ज्या पात्रताधारक पदवीधरांना वन व्यवस्थापन, वनशास्त्र वा पर्यावरण विज्ञान यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासह पुढील करिअर करायचे असेल अशांसाठी हे पदव्युत्तर अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट अभ्यासक्रम
केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयातर्फे देशांतर्गत विविध वित्तीय संस्था, बँका, गुंतवणूक व आर्थिक क्षेत्रासाठी प्रशिक्षित अधिकारी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट येथे उपलब्ध असणा-या फायनान्शियल मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या 2013-2015 या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
* आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी, त्यांना वित्तीय कॉर्पोरेट क्षेत्रातील संबंधित कामाचा कमीत कमी 3 वर्षे काम करण्याचा अनुभव असायला हवा व त्यांनी व्यवस्थापन अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी आवश्यक असणारी कॉमन एंट्रस टेस्ट म्हणजेच ‘कॅट’ ही प्रवेश पात्रता दिलेली असावी.
* वयोमर्यादा : अर्जदारांचे वय 50 वर्षांहून अधिक नसावे.
* निवड पद्धती : पात्रताधारक अर्जदारांमधून त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी, अनुभव व ‘कॅट’मधील गुणांकांच्या आधारे त्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.
*अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : या अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंटच्या दूरध्वनी क्र. 0129-2418879 वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिट्यूटच्या http:\\\\nifm.ac.in/eu/admission/information-brochure/pgdm.fm-brochure या संकेतस्थळाला भेट द्यावी.
* अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : वरील संकेतस्थळावर संगणकीय पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2013.
ज्या उमेदवारांना वित्तीय संस्था, व्यवस्थापन क्षेत्रात विशेष पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासह पुढील करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा अवश्य विचार करावा.