आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Competative Examination : Graduate Pharmacy Aptitude Test

स्‍पर्धा परीक्षा : ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनतर्फे फार्मसी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणा-या ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट, जीपीएटी : 2013 साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
* आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून त्यानंतर फार्मसी विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. अथवा ते फार्मसी विषयातील पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले असावेत.
* निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना लेखी निवड, पात्रता परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निर्धारित 57 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. या परीक्षा केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळवणा-या उमेदवारांना त्यांची शैक्षणिक पात्रता व लेखी निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.
* अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी आपल्या अर्जासह 1200 रु.(राखीव गटातील विद्यार्थ्यांनी 600 रु.) परीक्षा शुल्क म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत चलनद्वारा भरणे आवश्यक आहे.
* अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ऑल इंडिया कौन्सिल पॉर टेक्निकल एज्युकेशनच्या दूरध्वनी क्र. 011-23724151 अथवा 022-66258304 वर संपर्क साधावा. किंवा एआयसीटीईच्या www.aicte-india.org किंवा www.aicte-gpat.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
* अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2013.
फार्मसी विषयासह पदवीधर असणा-या विद्यार्थ्यांनी त्याच विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी या अभ्यासक्रमाचा अवश्य विचार करावा.

मॅनेजमेंट बिझनेस फायनान्स फेलो
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स, नोएडा येथे उपलब्ध असणा-या मॅनेजमेंट ऑफ बिझनेस फायनान्स व फेलो प्रोग्रॅम इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विशेष अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
*आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी पदवी परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह (महिला व राखीव गटातील उमेदवारांनी 45% गुणांसह) उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. याशिवाय त्यांनी सीएटी, एक्सएटी, एआयएए, एमएटी, सी-एमएटी, जीएमएटी यासारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
* निवड प्रक्रिया ­: अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांच्या पदवी परीक्षेतील टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकांच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
* अभ्यासक्रमांचा कालावधी : वर नमूद केल्यापैकी मॅनेजमेंट ऑफ बिझनेस फायनान्स या अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षे असून, फेलो प्रोग्रॅम इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या अभ्यासक्रमाचा कालावधी 3 वर्षे आहे.
* अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 1,250 रु.चा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्सचा नावे असणारा व दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
* अधिक माहिती व तपशील : या अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स http://registration.iif.edu या संकेतस्थळाला भेट द्यावी.
* अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स, ए-10, सेक्टर-83, नोएडा, उत्तर प्रदेश -201305 या पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2013.
ज्या पदवीधरांना वित्तीय सेवा वा आर्थिक क्षेत्रात पदव्युत्तर पात्रतेसह पुढे करिअर करायचे असेल, अशांनी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणे फायदेशीर ठरू शकते.

रविशंकरन इन्लॅक्स फेलोशिप
इन्लॅक्स फाउंडेशनतर्फे जैवविकास, पर्यावरण संरक्षण संवर्धन इ. क्षेत्रात विशेष काम करण्यासाठी देण्यात येणा-या रविशंकरन इन्लॅक्स फेलोशिप पाठ्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक संशोधक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
* पाठ्यवृत्तीचा तपशील : या फेलोशिप पाठ्यवृत्ती योजनेत वर नमूद केलेल्या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम विदेशातील प्रतिष्ठित शैक्षणिक वा संशोधन संस्थांमधील उमेदवारी वा याच विषयातील देशांतर्गत विशेष संशोधनपर काम करणा-या उमेदवारांचा विचार करण्यात येईल.
* आवश्यक पात्रता : अर्जदार चांगल्या शैक्षणिक आलेखासह पदवीधर असावेत व त्यांना जैवविकास, पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक स्रोत संवर्धन यासारख्या विषयांमध्ये संशोधनपर काम करण्याची आवड असायला हवी.
* वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 15 एप्रिल 2013 रोजी 30 वर्षांहून अधिक नसावे.
* निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.
* फेलोशिप-पाठ्यवृत्तीचे स्वरूप : निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या संशोधन प्रकल्पासाठी व विशिष्ट कालावधीकरिता शैक्षणिक शुल्क, पाठ्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय त्यांना संशोधन प्रकल्पावरील खर्च व संशोधन प्रकल्पाच्या प्रायोगिक अंमलबजावणीसाठी पण मदत करण्यात येईल.
* अधिक माहिती व तपशील : या संशोधनपर फेलोशिपच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी रविशंकरन इन्लॉक्स फेलोशिप योजनेच्या www.ravisankaran.org अथवा www.ravisankaran.org या संकेतस्थळांना भेट द्यावी.
* अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2013.
जैवविज्ञान विकास वा पर्यावरण संरक्षण विकासविषयक क्षेत्रातील पात्रताधारक उमेदवारांना याच विषयात पाठ्यवृत्तीसह देश, विदेशातील शैक्षणिक संशोधन संस्थांमध्ये संशोधनपर काम करायचे असल्यास त्यांनी या फेलोशिप योजनेचा जरूर लाभ घ्यावा.