आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Competative Examination: Selective Scholarshi For The Foreign Education

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पर्धा परीक्षा: विदेशातील शिक्षणासाठी निवडक शिष्यवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय विद्यार्थ्यांना विदेशातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणासाठी खालीलप्रमाणे शिष्यवृत्तीच्या संधी उपलब्ध आहेत-
न्यू कॅसल युनिव्हर्सिटीची ग्लोबल लीडर बिझनेस अवॉर्ड शिष्यवृत्ती :
आवश्यक पात्रता : न्यू कॅसल न्युनिव्हर्सिटी बिझनेस स्कूलतर्फे भारतीय विद्यार्थ्यांना व्यवस्थापनपर नेतृत्व विकासासाठी देण्यात येणा-या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदार एमबीए पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांना औद्योगिक, व्यवस्थापन विषयातील कामाचा तीन वर्षांचा अनुभव असायला हवा.
शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इंग्लंडच्या निवडक 24 व्यवस्थापन शिक्षण संस्थांद्वारे व्यवस्थापनविषयक विशेष शिक्षण देण्यात येईल व त्या दरम्यान त्यांना 2500 अमेरिकन डॉलरची शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी न्यू कॅसल युनिव्हर्सिटीच्या www.ncl.ac.uk
या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा lisa.thomas@ncl.ac.uk या इ-मेलवर संपर्क साधावा.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2013.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेटमेंटची - सीएटी-2013
आयआयएस म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटअंतर्गत आयआयएम अहमदाबाद, बंगळुरू, कोलकाता, इंदोर, काशिपूर, कोझीकोड, लखनऊ, रायपूर, रांची, रोहतक, शिलाँग, त्रिचरापल्ली व उदयपूर येथे उपलब्ध असणा-या व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणा-या कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट - सीएटी : 2013 या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी 5%नी शिथिलक्षम आहे.


निवड प्रक्रिया : निवड परीक्षा देशांतर्गत 40 शहरांमध्ये उपलब्ध असणा-या संगणकीय व्यवस्थाद्वारे 16 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2013च्या दरम्यान घेण्यात येईल. निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणा-या उमेदवारांना समुह चर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल.


अर्जासह भरावयाचे शुल्क : प्रवेश पात्रता परीक्षेचे प्रवेश शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी 1600 रु. (राखीव गटातील उमेदवारांनी 800 रु.) संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रम व प्रवेश पात्रता परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या www.cat.2013.iimidr.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व कालावधी : संगणकीय पद्धतीने आयआयएमच्या वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2013.


विशेष सूचना : वर नमूद केल्याप्रमाणे असणा-या व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विविध शाखांमध्ये व्यवस्थापन क्षेत्रांतर्गत संशोधनपर फेलोशिपपण उपलब्ध असून, त्याची माहिती पण आयआयएमच्या वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.