आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Competative Examination : Special Scholarship For Shedule Caste Bodha Students

स्पर्धा परीक्षा : राज्यातील अनुसूचित जाती-नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत समाजकल्याण आयुक्तालय, पुणेद्वारा अनुसूचित जाती/ नवबौद्ध विद्यार्थी-विद्यार्थिनींना 2013-2014 या शैक्षणिक वर्षात परदेशातील शिक्षणासाठी देण्यात येणा-या शिष्यवृत्तींसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत
* उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत उपलब्ध असणा-या व देण्यात येणा-या शिष्यवृत्तींची संख्या खालीलप्रमाणेआहे.
* पदव्युत्तर पदवी : व्यवस्थापन 8, अभियांत्रिकी 10, वैद्यकीय 8. एकूण शिष्यवृत्ती 26.
* डॉक्टरेट - पीएचडी : कला 10, वाणिज्य 4, विज्ञान 6, अभियांत्रिकी 4, एकूण शिष्यवृत्ती 24.
* आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत
* विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
* ते अनुसूचित जाती/ नवबौद्ध असावेत.
* अर्जदार विद्यार्थ्यांचे वय 35 वर्षांहून अधिक नसावे.
* अर्जदार विद्यार्थ्यांचे पालक आणि कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
* संबंधित विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमांसाठी विदेशी विद्यापीठ वा संबंधित संशोधन संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.
* अर्जदार विद्यार्थ्याच्या पात्रता परीक्षेताली गुणांची टक्केवारी कमीत कमी 50% असायला हवा.
* शिष्यवृत्तीचे स्वरूप व तपशील : निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी विमान भाडे, इंग्लंडमधील शैक्षणिक संस्थांसाठी वार्षिक 9000 पाउंड तर अमेरिका व इतर देशांमधील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी वार्षिक 14000 यू.एम. डॉलर्स, शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येतील.
याशिवाय त्यांना आकस्मिक खर्च, पुस्तके, अभ्यास दौरा, कार्यशाळेतील सहभाग, टायपिंग, बाइंडिंग इ.साठी वार्षिक अनुक्रमे 1000 पौंड व 1375 युएस डॉलर देण्यात येतील.
* अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी. अथवा विभागाच्या www.maharshtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्याचे साहाय्य आयुक्त समाज कल्याण, संबंधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अथवा आयुक्त व समाजकल्याण विभागाच्या शिक्षण शाखेत पण उपलब्ध होऊ शकतील.
* अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, 3, चर्च रोड, पुणे 411001 या पत्त्यावर 17 जुलै 2013 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना विदेशी विद्यापीठ वा संशोधन संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी व संशोधनपर पीएचडी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते.


फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी तंत्रज्ञान पदविका
फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर येथे खाली नमूद केल्याप्रमाणे कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
* कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम- दोन वर्षे कालावधी व मराठी माध्यम.
* कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्याक्रम - तीन वर्षे कालावधी व सेमी इंग्रजी माध्यम.
* आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थी शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत.
* निवड पद्धती : अर्जदार विद्यार्थ्यांसाठी पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणेतर्फे संगणकीय पद्धतीवर आधारित प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. संबंधित विद्यार्थ्यांची 10वीच्या पद्धतीतील गुणांची टक्केवारी व संगणकीय निवड पद्धतीच्या गुणांकावर आधारित जिल्हानिहाय प्रवेश देण्यात येईल.
* अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक 25 रु. रोखीने भरल्यास महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या संबंधित जिल्ह्यातील अधिकृत केंद्रावर उपलब्ध होईल.
* अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी 300 रु. (राखीव गटातील उमेदवारांनी 150 रु.) रोखीने महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या अधिकृत केंद्रावर भरणे आवश्यक आहे.
* अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क अधिका-यांशी दूरध्वनी क्र. 02167-304204 वर संपर्क साधावा अथवा महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http://oasis.mkcl.org/agridiploma या संकेतस्थळाला भेट द्यावी.
* अर्ज जमा करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र, तपशील आणि शुल्कासह असणारे अर्ज महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या अधिकृत केंद्रावर जमा करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2012.
10वी उत्तीर्ण ज्या विद्यार्थ्यांना कृषी तंत्रज्ञान विषयातील पदविकेसह आपले करिअर करायचे असेल त्यांच्यासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात.