कनेक्टेड राहणारे डाटा / कनेक्टेड राहणारे डाटा कार्ड

दिव्य मराठी प्रतिनिधी

Aug 10,2012 10:26:58 PM IST

ग्लोबल इन्फर्मेशन अ‍ॅँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सोल्युशन कंपनी हुआईने एक नवीन डाटा कार्ड आणले आहे. याच्या मदतीने तुम्ही सातत्याने इंटरनेटशी कनेक्ट राहू शकता. फए355 र नावाच्या या डाटा कार्डमध्ये वायफायची सुविधा उपलब्ध आहे. हा डोंगल डाटा कार्डाचे तर काम करेलच, पण यात मोबाइल वायफाय हॉटस्पॉटही आहे, यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी एकाच वेळी पाच डिव्हाइसशी जोडला जाऊ शकतो. या डाटा कार्डाचे मूल्य 5499 रुपये इतके आहे.
मायकसॉफ्ट विंडोज-8 बाजारात येण्यापूर्वीच त्याला पायरसीपासून वाचवण्यासाठी पावले उचलली आहेत. गेल्या काही दिवसांत विंडोज-8 ची प्रॉपर्टी लीक झाल्यामुळे दक्षता बाळगण्यात येत आहे. नव्या अ‍ॅक्टिव्हेशन पॉलिसीअंतर्गत प्रत्येक मशीनच्या बायोसमध्ये त्याच्या हार्डवेअरनुसार एक युनिक अ‍ॅक्टिव्हेशन की नोंदवली जाईल. यापूर्वी मायक्रोसॉफ्टने अ‍ॅक्टिव्हेशन पॉलिसीमध्ये एक कॉमन अ‍ॅक्टिव्हेशन की वापरण्याचे ठरवले होते. याशिवाय विंडोज-8 पायरसीपासून बचावण्यासाठी मायक्रोसॉफ्ट दुसरी पावले उचलत आहे. आता व्हेंडर्सला प्रॉडक्ट की मायक्रोसॉफ्टकडून मिळेल. सर्टिफिकेट ऑफ ऑथेंटिसिटीऐवजी आता सर्व नव्या सिस्टिम आता जेन्युइन मायक्रोसॉफ्ट स्टिकरसह येतील.

X
COMMENT