आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conservative Of Mothertung's Heritage,marathi gujrati Libraray

मातृभाषेचा वसा जपणारे मराठी-गुजराती वाचनालय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कुठल्याही भाषेची समृद्धी ही केवळ ती त्या त्या प्रदेशापुरतीच जपण्याने होत नाही. त्या भाषेतील साहित्याची इतर भाषांमध्ये देवाणघेवाण झाल्याने एकमेकांच्या सान्निध्यात या भाषा समृद्ध होत असतात. गुजराती आणि मराठी भाषेतील साधर्म्य लक्षात घेता आजपर्यंत कैक अनुवाद या दोन्ही भाषांमध्ये झाले आहेत. प्रसिद्ध गीतकार आनंदजी यांच्या पुस्तकाचा गुजराती व मराठीत अनुवाद हे याचेच उदाहरण आहे.

हाच भिन्न प्रदेशांमधील भिन्न भाषांमधील समान दुवा लक्षात घेऊन वाचन संस्कृती जोपासण्याचा एक प्रयत्न पंचवटी येथील कै.किका कुशाल छगन कुशाल यांनी 1983 मध्ये आपली वडिलोपार्जित छगन भवन विक्री करून पंचवटीमध्ये एकमेव गुजराती वाचनालय सुरू केल आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असे गुजराती वाचनालय सुरू करून त्यांनी गुजराती भाषा व वाचन संवर्धनाचा वसा वर्षानुवर्षे जपला आहे. मुख्य म्हणजे बहुतांश लेखकांना गुजराती साहित्य मराठीमध्ये अनुवादित करण्यासाठी अनेकदा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नाही. ते उपलब्ध करून देण्याचे काम हे वाचनालय करून देत आहे.

या ठिकाणी गुजराती बांधवांसाठी गुजराती साहित्यकार आणि लेखकांच्या दर्जेदार आणि वाचनीय पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. सुमारे दहा हजार विविध गुजराती लेखकांच्या पुस्तकांचा ठेवा या ठिकाणी असून गुजराती भाषकांसाठी हे नाशिकमध्येच नाहीतर उत्तर महाराष्ट्रात एकमेव वाचनालय असल्याचे सांगण्यात आले आहे. तीस वर्षांपासून हे वाचनालय होते तसेच सुरू असून वाचनालयाच्या उन्नतीसाठी बांधवांनी मदत करण्याची अपेक्षा आहे. तीनशे सभासद आणि शंभर रुपये वार्षिक सभासद फी असूनही नसल्यासारखी आहे. नवभारत साहित्य मंदिर यांच्याकडून पुस्तकांचे अनुदान प्राप्त होते. वाचनालयाला पालिकेतर्फे अनुदान देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. नाशिक येथील रहिवासी माधवी आडवदकर यांची गुजराती भाषकांबरोबर नाळ जुळलेली आहे. त्यांना उत्तम गुजराती भाषा बोलता येते. त्यांनी निवडक गुजराती पुस्तकांचे मराठी भाषेत अनुवाद केले आहेत. त्यांचे सासर वडोदरा येथे असल्याने गुजराती भाषा आणि संस्कृती त्यांना आवडते. अजूनही त्या नियमित वाचनालयात हजेरी लावतात.

या पुस्तकांचा संग्रह
रामायण, शिवपुराण, वेद आणि पौराणिक पुस्तकांबरोबरच हरकिशन मेहता यांचे मुक्तिबंधन, अश्विन भट यांचे ओथार, गुलाबदास ब्रोकर यांचे शब्दसृष्टी, तारक मेहता यांचे उमदा चष्मा, गानम शर्मा यांचे एक गुन्हेगार, किरनराय वडेरा यांचे द्रोह-विद्रोह, रामचंद्र ठाकूर यांचे ऊर्मिला, आदी नामांकित लेखक आणि साहित्यिकांची पुस्तके या वाचनालयात आहेत.