आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

याेग्य उपचाराने ब्रेन अटॅक येताे नियंत्रणात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२९ अाॅक्टोबर हा दिवस जागतिक पक्षाघात दिन म्हणून साजरा झाला. हा दिवस पक्षाघात किंवा ब्रेन अटॅक ह्या गंभीर आजाराची माहिती जनसामान्यांना व्हावी व या आजाराची कारणे व उपचाराची जागरूकता व्हावी म्हणून साजरा केला जातो. ब्रेन अटॅक हा गंभीरआजार आहे व तो कोणालाही होऊ शकतो.

ब्रेन अटॅकच्या जागतिक वैद्यकीय संशोधनात असे आढळून आले आहे की, खंडित झालेल्या मेंदूचा रक्तपुरवठा पहिल्या साडेचार तासात सुरळीत केला असता. मेंदूच्या बऱ्याच कोशिका मृत होण्यापासून वाचवता येतात, जेणेकरून ब्रेन अटॅकची तीव्रता कमी होते किंवा ब्रेन अॅटॅकच्या  लक्षणांमध्ये  लवकर सुधारणा होण्यास मदत होते. पहिल्या एक तासाच्या आत रुग्णाला योग्य तो उपचार मिळाल्यास ब्रेन अटॅकची तीव्रता कमी होऊन जास्तीत  जास्त फायदा होतो. म्हणूनच या पहिल्या  एका तासाला गोल्डन अवर किंवा सुवर्णकाळ असे संबोधले जाते. हिमोरेजिक स्ट्रोक साधारणत: अतिउच्च रक्तदाबामुळे होताे. अशा रुग्णांमध्ये रक्तदाब नियंत्रणात आणणे अतिशय महत्त्वाचे  असते.

भारतामध्ये प्रत्येक मिनिटाला ३ व्यक्ती पक्षाघाताच्या आजाराला बळी पडतात. तर संपूर्ण जगभरात ६ पैकी १ व्यक्तीला त्याच्या आयुष्यात  ब्रेन अटॅक येण्याची शक्यता असते. २००४ च्या इंडियन मेडिकल कौन्सिलच्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये ब्रेन अटॅकचे सुमारे ९.३ लाख रुग्ण आढळून आले. त्यापैकी ६.४ लाख रुग्ण  मृत पावले. योग्य व वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे बऱ्याच रुग्णांना कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागले. या सर्व बाबींव्यतिरिक्त रुग्ण  व त्याचा कुटुंबावर होणारा तत्काळ व भयंकर परिणाम हा आयुष्य उद्ध्वस्त करतो.

पक्षाघाताची कारणे
मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाल्याने किंवा मंेदूमध्ये रक्तस्राव झाल्याने मेंदूच्या पेशी मृत पावतात. मेंदूच्या कोणत्या भागात आघात होतो यावर पक्षाघाताची लक्षणे अवलंबून असतात. ही लक्षणे तात्पुरती किंवा कायमस्वरूपी असू शकतात. सर्वसाधारणपणे खालील लक्षणे आढळून येतात.  

चेहरा, हात िकंवा अचानक सुन्न पडणे िंकंवा लुळा पडणे. वाचा जाणे, बोलण्यामध्ये ताेतरेपणा येणे किंवा दुसरे काय बोलत आहेत ते न समजणे. अचानक अंधुकपणा येणे किंवा दृष्टी जाणे. डोके अचानक गरगरणे, चक्कर येणे. चाल अस्थिर होणे, तोल जाणे, तिरळेपणा, एकच वस्तू दोन-दोन दिसणे. अचानक कोणतेही कारण नसताना डोके भयंकर दुखू लागणे.गिळण्यास त्रास होणे.

ब्रेन अटॅकचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
मेंदूला रक्तपुरवठा खंडित होणे. मेंदूमध्ये रक्तस्राव होणे. कुठल्या प्रकारचा ब्रेन अटॅक आहे याचे अचूक निदान करणे अतिशय महत्त्वाचे असते. कारण दोन्ही प्रकारच्या ब्रेन अटॅकचे उचपार हे विभिन्न आहेत. याच्या निदानासाठी मेंेदूचा सीटी स्कॅन किंवा एमआरआय करणे अत्यावश्यक असते. याकरिताच ब्रेन अटॅकची लक्षणे दिसताक्षणीच ताबडतोब सीटी स्कॅन व मेंदूरोगतज्ज्ञ उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. इस्केमिक स्ट्रोक हा मेेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी झाल्यामुळे होतो. या गुठळ्या मेंदूतील रक्तवाहिनीमध्ये होऊ शकतात. शरीरातील इतर अवयवाप्रमांणे मेंदूकडे ऑक्सिजन साठवून ठेवण्याची साेय नसते. त्यामुळे रक्तपुरवठा खंडित झाल्यानंतर प्रत्येक मिनिटला मंेदूतील एकोणीस दक्षलक्ष कोशिका या मृत हाेतात.

मेंदूच्या कोशिकांमध्ये पुनर्निर्मितीची क्षमता नसल्यामुळे या कोशिकांना झालेली हानी कायमस्वरूपी असते. या मृत झालेल्या कोशिकांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक द्रव्यांमुळे अासपासच्या अधिकाधिक कोशिकांना हानी होऊन त्या मृत होऊ लागतात. अशा प्रकारे सुरुवातीला लहान भागात इजा झाली तरीही ती वाढू लागते. म्हणूनच रुग्णाच्या उपचारासाठी जितका जास्त वेळ लागेल तितक्या मेंदूतील अधिकाधिक कोशिका मृत होतात.

ब्रेन अटॅकची प्रमुख कारणे
इस्टेमिक स्ट्रोक

नियंत्रणात नसलेला उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, लठ्ठपणा, रक्तामधील अतिप्रमाणात असलेली चरबी,तंबाखूचे सेवन, हृदयविकार, अतिप्रमाणात  रक्त गोठण्याची प्रवृत्ती, 

हिमोरेजिक स्ट्रोक
अतिउच्च रक्तदाब, मेंदूतील अस्वाभाविक रक्तवाहिन्यांचा गुच्छा, अॅन्यरिझम-रक्तवाहिनीचे अावरण कमकुवत झाल्याने निर्माण झालेला फुगा फुटणे

- डाॅ. विजय घुगे, नाशिक