आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुपदेशन काळाची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवी आयुष्य त्रिमिती असतं. आयुष्याला लांबी, रुंदी, खोली ही असते. जीवनाइतकं महत्त्वाचं दुसरं काही असणं शक्य नाही, हे पटूनसुद्धा आपण तिन्ही बाजूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन क्वचितच स्वीकारतो. जीवनाची लांबी म्हणजे आयुर्मान/वय, रुंदी म्हणजे शारीरिक व मानसिक सुदृढता, तर खोली म्हणजे बुद्धिमत्ता.
आयुष्याला जर रुंदी नसेल, तर त्या लांबीला अर्थ नाही. तुम्ही किती जगलात त्यापेक्षा कसे जगलात, हे जास्त महत्त्वाचे. शारीरिक प्रकृतीकडे माणूस थोडंतरी लक्ष देतो, पण मानसिक प्रकृतीकडे फारच दुर्लक्ष करतो. अन्न, वस्त्र, निवारा या शारीरिक गरजांची जाणीव समजातल्या सर्व स्तरांना पटलेली आहे; परंतु मनाच्या मूलभूत गरजा उपेक्षितच राहतात.
ताण-तणाव, टेंशन याबद्दल हल्ली नेहमीच बोललं जातं. ताण सगळीकडे आहे. भावनिक, बौद्धिक, सामाजिक, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, आंतरिक, परिस्थितिजन्य, व्यक्तिजन्य ... कितीतरी प्रकारचे ताण-तणाव ही लढाई प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर आपापल्या परीनं लढावीच लागते. हे आपल्याला नवीन नाही. हे शतक ताण-तणावाचं, औदासिन्याचं म्हणून ओळखलं जाईल, असे शास्त्रज्ञ म्हणतात. त्या अर्थी या लढाईनं उग्र स्वरूप धारण केलंय एवढं मात्र नकी.
टेन्शन येतं म्हणजे नेमकं काय होतं, हे जाणून घेतल्याशिवाय त्यावर उपाय मिळणं अशक्य. यशस्वी माणसाला त्या यशाचं सुख ‘तो समजतो, तेवढं’ जरूर मिळतं, पण या यशाची किंमत म्हणून त्याला वाढीव ताणही पत्करावे लागतात.
एकाच वेळी यशस्वी आणि सुखी होणं ज्याला जमलं, त्याने आयुष्याचं गणित साधलं म्हणायचं. ताण... टेन्शन... दूध पिणे में टेन्शन है, असं लहान मुलंदेखील म्हणू लागली आहेत; पण ताण ही शरीराची एक अनाहुत अनावश्यक आणि त्रासदायक अशी प्रतिक्रिया आहे. या ताणामुळे औदासीन्य, निद्रानाश, वैफल्य, आत्महत्येची प्रवृती, असमाधान, चिडचिड, कंटाळा असे अनेक मानसिक परिणाम तर दिसतातच, पण शारीरिक ही दिसतात. अगदी दुपारपर्यंत बरा होता हो! अचानक हार्ट-अटॅक... हे तर सर्रास ऐकायला मिळतं, पण हे अचानक नसतं, तर कळत-नकळत ही ताणाशी लढाई मनात चालूच असते. अचानक फक्त परिणाम दिसतो.
पूर्वीच्या काळी एकत्रित कुटुंबपद्धती अस्तित्वात असल्याने एक प्रकारची भावनिक सुरक्षितता लाभत होती. मात्र, बदलत्या सामाजिक जीवनात हे खूप अवघड झाले आहे. त्यामुळे कौटुंबिक, वैवाहिक, शालेय व व्यासायिक क्षेत्रात अनेक समायोजन समस्या उद्भवतात. त्या सोडवण्यासाठी आजच्या प्रगत समाजजीवनात तज्ज्ञ समुपदेशक हे काम चोख पार पाडतात.
manobalclinic@gmail.com