आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Course On Wood And Panel Products Technology Syllabus

वुड अँड पॅनल प्रॉडक्ट्स टेक्नॉलॉजीमधील अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्लायवुड इंडस्ट्रीज रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, बंगळुरू येथील वुड अँड पॅनल प्रॉडक्ट्स टेक्नॉलॉजी विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत.


आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार बीएस्सी पात्रताधारक असावेत अथवा त्यांनी अभियांत्रिकी विषयातील पदवी घेतलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय 1-11-2013 रोजी 28 वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांनी निवड त्यांच्या संबंधित पदवी परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन प्लायवुड, बंगळुरू येथे नोव्हेंबर 2013मध्ये सुरू होणाºया पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अधिक माहितीसाठी इंडियन प्लायवुड इंडस्ट्रीज रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या दूरध्वनी 080-30534021, 28395970 वर संपर्क साधावा, www.ipirti.gov.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमून्यातील प्रवेश अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, इंडियन प्लायवुड इंडस्ट्रीज रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट,एचएमटी लिंक रोड, ऑफ नुमकूर रोड, पोस्ट ऑफिस यशवंतपूर, बंगळुरू 560022 या पत्त्यावर 5 सप्टेंबर 2013 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.