Home | Magazine | Rasik | cricket-betting-ipl-twenty-20

सट्टे पे सट्टा

विनायक दळवी, क्रीडा प्रमुख - दिव्य मराठी | Update - Jun 01, 2011, 06:48 PM IST

पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात झटपट सट्टा आणि झटपट कमाई शक्य नव्हती. ती वन -डे आणि ट्वेन्टी-२ ने शक्य झाली. आता वर्षभर कुठे ना कुठे क्रिकेटचा सामना सुरूच असतो. आयपीएलची तर संकल्पना आणि संयोजनच मुळात बेटिंगला क्रिकेटची प्रतिष्ठा देण्यासाठी केले गेले आहे. आयपीएलच्या या चौथ्या हंगामात ४५ दिवसांमध्ये साधारणपणे १२ हजार कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे...

 • cricket-betting-ipl-twenty-20

  सट्टेबाजी आणि क्रिकेट या खेळाचे अतूट नाते आहे. हिमनगासारखे, कधी एक दशांश पाण्यावर दिसणारे तर कधी दिसते त्यापेक्षा कितीतरी पाण्याखाली दडलेले. क्रिकेट आणि सट्टेबाजी किंवा बेटिंगचे विश्व आशिया खंडाभोवती अधिक प्रमाणात पसरलेले. भारत, पाकिस्तान आणि आता श्रीलंकन क्रिकेटवरही या सट्टेबाजीची काळीकुट्ट छाया पसरली आहे. प्रचंड प्रमाणावर पैसा मिळूनही क्रिकेटपटू त्यात गुरफटलेले. पदाधिकारी, संघटक आणि क्रिकेटभोवती वावरणारा वर्गदेखील यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गुरफटलेला, गुंतलेला. त्यामुळे अळीमिळी गुपचिळी म्हणून सारेच गप्प. कुणीतरी आजी अथवा माजी क्रिकेटपटू आरोप करतो आणि पुन्हा एकदा संशयाचे मोहोळ उठते. चौकशीचे फार्स सुरू होतात. आयसीसीला अचानक जाग येते. भारताने विश्वचषक जिंकून महिना उलटल्यानंतर श्रीलंकेच्या माजी कसोटीपटू हसन तिलकरत्ने याला अचानक कंठ फुटला. श्रीलंकेचे क्रिकेटपटू १९९२ पासून फिक्सिंगमध्ये सामील असल्याचे बेछूट आरोप त्याने केले आहेत. असे अनेक तिलकरत्ने वेळोवेळी उपटले आहेत. त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यात काही घायाळ झाले. मात्र आजतागायत कुणीही सट्टेबाजी आणि निकालनिश्चिती याबाबत ठोस पुरावे देऊ शकले नाहीत. इम्रानखानने मागे सुचविलेला उपाय चांगला होता. इम्रान म्हणाला होता, 'प्रत्येक क्रिकेटपटूची बँक अकाऊंटस्, त्यांची स्थावर मालमत्ता यांच्या वाढीची चौकशी करणे किंवा त्याबाबतचा योग्य तपशील मिळविणे हे फिक्सिंग करण्याच्या प्रयत्नांना रोखणारे ठरेल.' पण प्रत्येक वेळी सट्टेबाजी करणारे आणि निकालनिश्चिती करणारे चार पावले पुढेच आहेत. याचे कारण बेटिंगमध्ये गुंतलेला प्रचंड पैसा. आणि त्या जाûयात सापडलेला जुगारी प्रवृत्तीचा सर्वसामान्य माणूस.
  दुबईमध्ये, शारजाहमध्ये क्रिकेट सुरू झाले आणि बेटिंगला खऱ्या अर्थाने बरकत आली. भारत-पाक समर्थकांनी एकमेकांवर हात उगारतानाच बेटिंग खेळण्यासाठी हात खिशात घालायला सुरुवात केली. त्यावेळी क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन अल्प होतेच, पण अन्य मार्गाने मिळणारा पैसाही तुटपुंजा होता. मटक्याबरोबरच त्या काळी बदनाम असलेली दुसरी गोष्ट होती सोशल क्लब्स. बेटिंगने तेथेही शिरकाव केला. क्रिकेट सामने टेलिव्हिजनवर दिसायला लागले आणि बेटिंग करणाऱ्याची संख्या वाढायला लागली. कसोटी क्रिकेटपेक्षा कमी वेळेत निकाली ठरणारे ५-५ षटकांचे क्रिकेट रुजले. ५ दिवसांवरून ५ षटकांवर सामना आला आणि आता ट्वेन्टी-२. ट्वेन्टी-२ क्रिकेटच्या अल्पावधीत निकाल लागणा
  ऱ्या सामन्याच्या अखेरपर्यंत थांबण्याचीही तयारी पैसे खेळणा-यांची नव्हती. त्यामुळे १५-१५ षटकांपर्यंतच्या, १ षटकांपर्यंतच्या स्कोअरवर बेटिंग व्हायला लागले. १ षटकांनंतर ४ षटकांचे फिक्सिंग व्हायला लागले.
  ४ षटकांमधील एक ओव्हर आमची असे सांगून फिक्सिंग व्हायला लागले. ४ षटकांवरून मग बेटिंग प्रत्येक बॉलवर आले. कोणता बॉल नोबॉल असेल आणि कोणत्या बॉलवर चौकार, षटकार मारला जाईल येथवर बेटिंग व्हायला लागले. अशा बेटिंगमध्ये संघाला पराभूत करण्यासाठी कुणाच्या दाढीला हात लावण्याची गरज नव्हती. त्यामुळे अशा प्रकारच्या बेटिंगमुळे खेळाडूंचे वैयक्तिक फिक्सिंगही वाढले. ठरावीक चेंडूवर काय होणार यासाठी खेळाडूंना पैसे देऊन किंवा आपण जिंकलेल्या पैशातील हिस्सा देऊन त्यांना विकत घेण्याची प्रवृत्ती वाढली. नोबॉल टाकणे किंवा एखाद्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारायला देणे गोलंदाजांसाठी सोपी गोष्ट होती. तशा स्पॉट फिक्सिंगचा जमाना आता सुरू झाला. या स्पर्धांची स्थापनाच मुळात अशा अपप्रवृत्तींना खतपाणी घालणारी ठरली. ज्यांना क्रिकेटच्या विकासाचा गंध नाही किंवा काही योजना नाहीत अशांनी क्रिकेट संघ विकत घेतले. काळे पैसे पांढरे करणा
  ऱ्यासाठी अशा स्पर्धा आधार ठरल्या. संघाच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता राहिली नाही. क्रिकेट सामना संपला की मध्यरात्रीपर्यंत रंगणाऱ्या पार्ट्या हे एक आकर्षण ठरले. ठरावीक वर्गासाठी आणि वारेमाप पैसा मोजून तिकिटे घेणाऱ्यासाठी या पार्ट्या होत्या. ज्यामध्ये बेटिंग करणारेच अधिक संख्येने यायला लागले. खेळाडूंशी अधिक जवळीक साधायला लागले. क्रिकेटपटूंपुढे पैसा आणि नटनट्यांचे आमिष, जाळे फेकले गेले. खेळाडूंशी जवळीक साधून घेता येईल तेवढी माहिती संबंधितांनी घेतली.
  बेटिंग विश्व मोठे व्हायला एकमेकांवरचा विश्वास हे देखील एक कारण होते. अधर्मावर आधारित असलेल्या या विश्वाचा पाया एकमेकांवरील विश्वास असावा याचेच आश्चर्य वाटते. सर्वसाधारणपणे सट्टेबाज एकमेकांचे पैसे बुडवत नाहीत. पैसे बुडविणाऱ्यास संपूर्ण बेटिंग विश्वच वाळीत टाकते. पैसे वसूल करण्यासाठी कुणा गुंडाला सुपारी दिली जात नाही. कुणाचा खून होत नाही. पैसे बुडविणाऱ्याला किंवा डिफॉल्टरला वाळीत टाकले जाते. एखाद्याने पाच लाख बुडविले तर त्याचे होणारे नुकसान पाच कोटींच्या घरातले असते. कारण उद्योगधंद्याच्या नाड्या हातात असलेल्यांनी बहिष्कार टाकला तर ती व्यक्ती उद्योगधंद्यातूनच उठते. असे असले तरी अनादी काळापासून सट्टेबाजी सुरू आहे. सरकारी फतवे, आयसीसीच्या करड्या शिस्तीचे पाश, पोलिसांचा ससेमिरा यानंतरही सट्टेबाजी चालूच राहणार यात शंका नाही.
  मॅच फिक्सिंगकडे खेळाडू वळण्याचे कारण
  क्रिकेटमुळे त्या त्या देशांचे बोर्ड प्रचंड नफा कमावत असतात. खेळाडूंना मिळणारे वर्षाचे मानधन किती नाममात्र असते ते पाहा. आयपीएलसारख्या ४ दिवस चालणाऱ्या स्पर्धेत देखील अतिसामान्य खेळाडूंना यापेक्षा अधिक मानधन मिळते.  --
  visit @
  http://divyamarathi.bhaskar.com/
  www.psiddharam.blogspot.com

Trending