आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरळेपणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


डोळ्यातील स्नायूंची हालचाल सुसूत्रतेने न झाल्यामुळे उद्भवणा-या विकाराला (तिरळेपणा) म्हणतात. हा विकार एका डोळ्यात अथवा दोन्ही डोळ्यात असू शकतो.

कारणे :

1) स्नायूंची सदोष हालचाल.

2) डोळ्याच्या खोबणीची असमानता.

3) बुबळांमधील अंतर असमान असणे.

4)डोळ्याच्या स्नायूंचा कमकुवतपणा.

5) दृष्टीतील दोष.

6) इतर

लवकर निदान व त्वरित इलाज केल्यास हा विकार ब-या च अंशी दुरुस्त होऊ शकतो. नेत्रगोलकाची हालचाल करणा-या स्नायूंना नियंत्रित करणा-या तंत्रिका (nerves) पक्षाघात ग्रस्त होणे, या कारणामुळे ब-या च वेळा स्नायू हालचाल करू शकत नाहीत. तिरळेपणाचे कारण अचूक शोधून काढण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात. काही शस्त्रक्रियांद्वारे तिरळेपणा दुरुस्त करता येऊ शकतो.

अ‍ॅब्लायोपिया (amblyopia)- एखाद्या व्यक्तीची दृष्टी थोड्या प्रमाणात एका किंवा दोन्ही डोळ्यांची कमी होते. डोळ्यांच्या फंडोस्कोपीद्वारे केलेल्या तपासणीत कोणताही दृश्य दोष आढळत नाही. तसेच रुग्णात दुसरी कुठलीही लक्षणे नसतात. या प्रकारच्या आजाराला अ‍ॅब्लायोपिया (amblyopia) असे म्हणतात. या आजारात आनुवंशिक किंवा इतर घटक उदा. काही विषारी दव्ये प्रभाव दाखवतात. काही रुग्णांत मानसिक कारणांमुळेसुद्धा हा दृष्टिकोन उद्भवतो. सर्व तपासण्या काळजीपूर्वक केल्यानंतरच या आजाराचे निदान करता येते.

द्विनेत्रदृष्टी :
मानवी डोळा जेव्हा एखाद्या वस्तूची प्रतिमा डोळ्यात तयार करतो, तेव्हा ती प्रतिमा दोन्ही डोळ्यांच्या पटलांवर वेगवेगळी उमटते, परंतु मानवी मेंदूद्वारे दोन्ही प्रतिमा ग्रहण केल्या जातात व एकाच प्रतिमेचा भास होतो. ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे व त्यातील काही क्रिया अजून नीट आकलन झालेल्या नाहीत. त्यातील महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत.
* जन्मल्याबरोबर प्रतिमेचे नीट निश्चितीकरण होत नाही (fixation) व डोळे भराभर व स्वैर हालचाल करतात.
*पहिल्या महिन्याच्या शेवटी प्रतिमा नीट निश्चित होत जाते व ही क्रिया वयाच्या सहा महिन्यांपर्यंत पूर्ण होते.
* वयाच्या सहा महिन्यांपर्यंत अकोमोडेशन (accomodation) रिफ्लेक्स व मेंदूत दोन्ही डोळ्यांतील प्रतिमेचे निश्चितीकरण होते. (mucul stereopsis)
* वयाच्या सहा वर्षापर्यंत 6/6 ही संपूर्ण दृष्टिक्षमता तयार होते व द्विनेत्रदृष्टी पूर्णपणे तयार होते.
निस्टॅग्मस : हा आजार लहानपणापासून आढळतो. डोळ्यांची स्थिरता संपुष्टात येऊन डोळे लकलक हलू लागतात. डोळा स्थिर नसल्याने नजर कमी होते. अ‍ॅब्लिनो (albino) सारख्या रुग्णांमध्ये हा आजार प्रारब्धाने आढळतो.