ऑलिम्पिकवरील सायबर हल्ला / ऑलिम्पिकवरील सायबर हल्ला रोखणार

दिव्य मराठी

Apr 28,2012 05:08:27 AM IST

जुलै महिन्यात सुरू होत असलेल्या लंडन ऑलिम्पिकसंदर्भात जगभरात ऑनलाइन माहिती घेण्यात लोकांना इंटरेस्ट असेल. मात्र अशावेळी हॅकर्सपासून बचाव करणे गरजेचे आहे.

मागचा अनुभव लक्षात घेता आयोजक या ऑलिम्पिक स्पध्रेत सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवत आहेत. या दरम्यान 450 तंत्रज्ञांची फौज एखाद्या हॅकर्सच्या नजरेपासून हजारो कॉम्प्युटरमध्ये जमा असलेली खेळाडूच्या आकडेवारीची माहिती सुरक्षित करून ठेवते.

बीजिंगमध्ये ऑलिम्पिक सुरू होताच, अधिकाधिक वेबसाइट हॅक करण्यात आल्या. शिवाय कधी झाल्या याचा पत्ताही लागला नाही.

जुलै-ऑगस्ट 2012 मध्ये लंडनमध्ये होणार्‍या ऑलिम्पिकवर अतिरेकी हल्ल्याचाच धोका आहे, असे नसून सायबर हल्ल्याची मोठी भीती उत्पन्न झाली आहे. खेळांमध्ये जगातील सर्वात मोठय़ा स्पर्धेस हॅकर्सपासून वाचवण्यासाठी लंडन शहर तयारीला लागले आहे. ऑनलाइन ऑलिम्पिक सुरक्षा टीम खेळांची 90 मैदाने आणि आयोजनाशी संबंधित माहिती हॅकर्सपासून वाचवण्यासाठी सावधानी बाळगत आहे.

लंडन ऑलिम्पिकचे मुख्य सूचना अधिकारी गॅरी पॅनेल यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे की, यापूर्वीच्या खेळाच्या वेळी सातत्याने सायबर हल्ले झालेले आहेत. त्यामुळे या वेळीही ते होणारच. हे गृहीत धरून एटोस ओरिजन या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. ही कंपनी ऑनलाइन सिक्युरिटी पुरवते.

कंपनीने 450 तंत्रज्ञांचा संच आयोजनास हॅकर्सपासून वाचवण्यासाठी कार्यरत झाली आहे. या पूर्वीचे 90 खेळांचे कार्यक्रम, हजारो कॉम्प्युटर्समध्ये खेळाडूंची माहिती, हॅकर्स पळवू शकतात. त्यामुळे लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी बरीच मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

प्रत्यक्षात अशा प्रकारचे हल्ले कमी प्रमाणात झाले आहेत. सोफोस कंपनीचे समन्वयक ग्रॅहम क्लूले यांचे म्हणणे असे की, सायबर सुरक्षेसाठी होणार्‍या खर्चावर कोणीही आक्षेप घेणार नाही. कारण जाणकारांचे म्हणणे असे की, ते जरी सफल झालेले नसले तरी, हॅकर्स आता खेळालाही टार्गेट करू लागले आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे अत्यावश्यक बनले आहे.

X
COMMENT