आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • D.L.Ambulkar's Artical On Various Scholarship Examination

शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा: कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चौधरी चरणसिंह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल मार्केटिंगतर्फे व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या 2014-16 या सत्रांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी पशुवैद्यक, कृषी, कृषी विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, दुग्धव्यवसाय, फूड टेक्नॉलॉजी यासारख्या विषयांतील पदवी परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी 45%) उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते वरील पात्रता परीक्षेला बसलेले असावेत. याशिवाय अर्जदारांनी सीएटी, सीएमएटी यासारखी व्यवस्थापन अभ्यासक्रमविषयक प्रवेश पात्रता दिलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांची संबंधित पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व सीएटी/ सीएमएटीमधील गुणांकाच्या आधारे त्यांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्या आधारे त्यांना प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अभ्यासक्रमाचा प्रवेश अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी 1000 रु.चा (राखीव गटातील उमेदवारांनी 500 रु.च्या) डायरेक्टर जनरल, एनआयएएम यांच्या नावे असलेला व जयपूर येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल मार्केटिंग, जयपूरच्या दूरध्वनी क्र. 0141-2795140 वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिट्यूटच्या www.cesniam.gov.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2013.
कृषी वा कृषी विज्ञान विषयातील ज्या पदवीधारांना कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम करून आपले करिअर करायचे असेल अशांनी या पदविका अभ्यासक्रमाचा फायदा द्यावा.
दिल्ली विद्यापीठाचे विशेष अभ्यासक्रम
दिल्ली विद्यापीठातर्फे घेण्यात येणा-या मास्टर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स व मास्टर ऑफ फायनान्स अँड कंट्रोल या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित विषयासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यानंतर कुठल्याही विषयातील पदवी घेतलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. याशिवाय अर्जदार विद्यार्थ्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची ‘कॉमन एन्ट्रस टेस्ट’ (कॅट) प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
विशेष सूचना : जे विद्यार्थी यंदा त्यांच्या पदवी परीक्षेला बसले असतील तेसुद्धा या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व ‘कॅट’मधील गुणांकाच्या आधारे मसुद्याची आणि मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्या आधारे त्यांची संबंधित अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी 1700 रु.चा (राखीव गटातील अर्जदारांनी 800 रु.चा) डायरेक्टर, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, साऊथ कँपस यांच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी दिल्ली विद्यापीठाच्या दूरध्वनी क्र. 011-24111141 वर संपर्क साधावा अथवा विद्यापीठाच्या http://www.mbe-du.org
अथवा http://www.mic.edu
या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज हेड ऑफ दि डिपार्टमेंट, बिझनेस इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल स्टडीज, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, साऊथ कँपस, बेनिटो जुआरेझ रोड, नवी दिल्ली-110021 या पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2013.
ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासह अर्थशास्त्र, वित्तीय प्रशासन, व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमांचा अवश्य विचार करावा.
विदेशातील शिष्यवृत्ती
विदेशातील प्रमुख व निवडक विद्यापीठ-शिक्षण संस्थांमध्ये खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत-
केंब्रिज विद्यापीठाची गेट्स केंब्रिज शिष्यवृत्ती : केंब्रिज विद्यापीठातर्फे विभिन्न विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह या विषयांमध्ये संशोधनपर पीएचडी करण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेअंतर्गत देण्यात येणारी शिष्यवृत्ती एमएस्सी, मास्टर्स ऑफ लिटरेचर, एलएलएम, मास्टर्स ऑफ स्टॅटिस्टिक्स, एमबीए, एमफिल व पीएचडी यासारख्या अभ्यासक्रमांसाठी देण्यात येते.
शिष्यवृत्तींची संख्या : गेट्स शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देण्यात येणा-या शिष्यवृत्तींची एकूण संख्या 80 आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी जीआरई/ जीमॅट यासारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व पात्रता याआधारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्यावरून त्यांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे कालवधीसाठी केंब्रिज विद्यापीठांतर्गत संबंधित अभ्यासक्रमासाठी गेट्स केंब्रिज शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अर्ज, माहितीपत्रक व तपशिलासाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी केंब्रिज विद्यापीठाच्या www.gatescambridge.org
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठवण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने तपशीलवार भरलेले व प्रस्तावित संशोधन प्रकल्प प्रारूपासह असणारे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 3 डिसेंबर 2013.
इंग्लंडमधील विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांसाठीची शिव्हनिंग शिष्यवृत्ती
ब्रिटन सरकार व कॉमनवेल्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नेतृत्वविषयक क्षेत्रात काम करण्यासाठी इंग्लंडमधील विविध विद्यापीठांमध्ये शिव्हनिंग शिष्यवृत्ती देण्यात येते.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी ‘टॉफेल’सारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व संबंधित पात्रता परीक्षेतील गुणांकांच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षे कालावधीच्या विशेष अभ्यासक्रमासाठी शिव्हनिंग शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी शिव्हनिंग शिष्यवृत्ती योजनेच्याwww.chevening.org
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज वरील संकेतस्थळावर 13 डिसेंबर 2013 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसह विदेशी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम वा विशेष शिक्षण घ्यायचे असेल त्यांनी या शिष्यवृत्तींचा जरूर विचार करावा.
इनोव्हेटिव्ह यंग बायो-टेक्नॉलॉजिस्ट्स अवॉर्ड-2013
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत असणा-या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीतर्फे बायोटेक्नॉलॉजी, वैद्यकशास्त्र, कृषी, पशुवैद्यकशास्त्र यासारख्या क्षेत्रात संशोधकांना संशोधनपर काम करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी देण्यात येणा-या इनोव्हेटिव्ह यंग बायो-टेक्नॉलॉजिस्ट्स अवॉर्ड-2013 साठी पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून प्रवेशिका मागवण्यात येत आहेत-
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी, बायोटेक्नॉलॉजी, वैद्यकशास्त्र, कृषी, कृषी विज्ञान अथवा पशुवैद्यकशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी कमीत कमी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी, शैक्षणिक आलेख चांगला असावा. याशिवाय त्यांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान असावे व संबंधित क्षेत्रात संशोधनपर कामाची आवड असायला हवी. पीएचडी पात्रताधारक व संबंधित विषयातील अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय 35 वर्षांहून अधिक नसावे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील : निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या संशोधन कालावधीत संबंधित शैक्षणिक/ संशोधन संस्थेतील प्रकल्प मार्गदर्शकाच्या हाताखाली काम करावे लागेल. या काळात संबंधित संशोधक-उमेदवार सेवारत असल्यास त्यांना त्यांच्या संशोधन कालावधीसाठी वार्षिक 1 लाख रु. संशोधनपर शिष्यवृत्ती व वार्षिक आकस्मिक खर्चापोटी 50 हजार रु. देण्यात येतील. संशोधक सेवारत नसल्यास त्यांना त्यांच्या संशोधन कालावधीसाठी दरमहा 40 हजार रु. संशोधनपर शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या www.chevening.org
अथवा http://www.btisnet.gov.in/lyba.htm
या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डॉ. टी. मदनमोहन, अ‍ॅडव्हायझर, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ब्लॉक नं.-2, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 या पत्त्यावर पाठवावेत. बायोटेक्नॉलॉजीसह कृषी, वैद्यकशास्त्र, वा पशुविज्ञान याविषयात व्यापक संशोधनपर काम करू इच्छिणा-यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना फायदेशीर ठरू शकते.