आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • D.V. Ambulkar Artical On Scholarship Competative Examination

शिष्‍यवृत्ती स्पर्धा परीक्षा: श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स - दिल्लीचा विशेष अभ्यासक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स, दिल्ली येथे उपलब्ध असणा-या दोन वर्षे कालावधीच्या ‘ग्लोबल बिझनेस ऑपरेशन्स’ या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक चांगला असायला हवा.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा 16 फेब्रुवारी 2014 रोजी देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल व त्यामध्ये मुंबई केंद्राचा समावेश असेल. निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणा-या उमेदवारांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच मिळण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी 1500 रु.चा (राखीव गटातील उमेदवारांनी 1000 रु.चा) प्रिन्सिपॉल, श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या नावे असणारा व मुंबई येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या दूरध्वनी क्र. 011-27667905 अथवा 0120-4160880 वर संपर्क साधावा अथवा कॉलेजच्या www.srcc.edu
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज प्रिन्सिपॉल, श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, मॉरिस नगर, दिल्ली-110007 या पत्त्यावर 15 जानेवारी 2014 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
ज्या पदवीधरांना आंतरराष्ट्रीय व्यवसाय, व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासह आपले करिअर करायचे असेल, अशांनी या अभ्यासक्रमाचा विचार करावा.
जवाहरलाल नेहरू सायन्स फेलोशिप
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विज्ञान, भौतिक विज्ञान व गणित विषयातील संशोधकांना विदेशातील संशोधनपर कामासाठी देण्यात येणा-या संशोधनपर फेलोशिपसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे संशोधक उमेदवारांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदार विज्ञान, भौतिक विज्ञान वा गणित विषयातील पीएचडी असावेत, त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्याना संशोधनपर कामाची आवड असायला हवी.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक संशोधकांना सादरीकरण व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.
फेलोशिपचा कालावधी व तपशील : निवड झालेल्या संशोधकांना चारा महिने कालावधीसाठी 25 संशोधनपर फेलोशिप देण्यात येतील. योजनेअंतर्गत त्यांना 1 लाख रुपये अमेरिकी डॉलरची पाठ्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय त्यांना वार्षिक 5.5 लाख डॉलरची रक्कम संशोधन प्रकल्पविषयक कामासाठी सहायकांची नेमणूक करण्यासाठी देण्यात येईल. संशोधन कामाच्या कालावधीदरम्यान संशोधकांना निवास, भोजन, प्रवास इ. सुविधा पण पुरविल्या जातील.
अधिक माहिती व तपशील : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या www.dst.gov.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेल्या व आवश्यक तो
तपशील आणि कागदपत्रांसह असणा-या प्रवेशिका सेक्रेटरी, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी भवन, न्यू मेहरोली रोड, नवी दिल्ली-110006 या पत्त्यावर लवकरात लवकर पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात. ज्या संशोधकांना विज्ञान व गणित विषयातील उच्च शिक्षणानंतर पुढील संशोधनपर काम विदेशी विद्यापीठांमध्ये करायचे असेल अशांनी या योजनेचा विचार करावा.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळचा अभ्यासक्रम
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळ येथे उपलब्ध असणा-या वन व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी 45% गुणांसह) उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते यंदा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले असावेत. याशिवाय अर्जदारांनी सीएटी-2013 ही व्यवस्थापन अभ्यासक्रमविषयक प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
प्रवेश पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व सीएटी-2013 मधील गुणांकाच्या आधारे समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
विशेष शिष्यवृत्ती : वरील अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या निवडक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील कामगिरीच्या आधारे त्यांना दरमहा 5000 रु.ची विशेष शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी 900 रु.चा (राखीव गटातील उमेदवारांनी 450 रु.चा) डायरेक्टर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या नावे असणारा व भोपाळ येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह इन्स्टिट्यूट कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या www.iifm.ac.in/admission
अथवा www.mponline.gov.in
या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज डायरेक्टर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, नेहरू नगर, भोपाळ 462003 या पत्त्यावर 21 जानेवारी 2014 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
ज्या विद्यार्थ्यांना वन व्यवस्थापन क्षेत्रात विशेष पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासह आपले करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करावा.
दिल्ली विद्यापीठाची व्यवस्थापन विषयांतर्गत पीएचडी
दिल्ली विद्यापीठांतर्गत कार्यरत असणा-या फॅक्टरी ऑफ मॅनेजमेंट स्टडीजअंतर्गत दोन वर्षे कालावधीच्या व्यवस्थापन विषयांतर्गत एमबीए व पीएचडी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अभासक्रमनिहाय पात्रता व प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल-
एमबीए अभ्यासक्रम : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी ते सर्वसाधारण गटातील असल्यास कमीत कमी 50% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांनी 45% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांनी सीएटी-2013 ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
प्रवेश प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व सीएटीमधील गुणांकाच्या आधारे त्यांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची एमबीए अभ्यासक्रमासाठी अंतिम निवड करण्यात येईल.
व्यवस्थापन विषयातील संशोधनपर पीएचडी : अर्जदार व्यवस्थापन वा संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादतर्फे 16 ऑक्टोबर 2013 रोजी घेण्यात आलेली कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट-2013 दिलेली असावी.
प्रवेश प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदव्युत्तर पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व कॉमन एंट्रन्स टेस्टमधील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची व्यवस्थापन विषयातील संशोधनपर पीएचडीसाठी नोंदणी करण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अभ्यासक्रमाशी संबंधित अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 250 रु.चा दि रजिस्ट्रार, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह दिल्ली विद्यापीठाच्या फॅक्टरी ऑफ मॅनेजमेंट स्टडीजकडे पाठवावा.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या दूरध्वनी क्र. 011-2766382 वर संपर्क साधावा. अथवा www.du.ac.in, www.fms.edu
अथवा www.cat2013iimidr.ac.in
या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2014.
ज्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर व्यवस्थापन विषयातील एमबीए व संशोधनपर पीएचडी करायची असेल अशांनी या संधींचा लाभ घ्यावा.
एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ
डिझाइन, पुणेचे अभ्यासक्रम
एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पुणे येथे खाली नमूद केल्याप्रमाणे असणा-या विषयांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत समाविष्ट विषय
* प्रॉडक्ट डिझाइन.
* ग्राफिक डिझाइन.
* ट्रान्सफॉर्मेशन डिझाइन.
* अ‍ॅनिमेशन डिझाइन.
* रिटेल अँड एक्झिबिशन डिझाइन.
* फिल्म अँड व्हिडिओ डिझाइन.
* इंटिरियर स्पेस अँड इक्विपमेंट डिझाइन.
* युजस एक्प्रिइयंस डिझाइनमधील पदवी अभ्यासक्रम.
युनिव्हिर्सिटी फॉर क्रिएटिव्ह आर्ट्स इंग्लंडच्या सहकार्याने घेण्यात येणारे अभ्यासक्रम.
* फॅशन डिझाइनमधील बीए (ऑनर्स).
* फॅशन प्रमोशन अँड इमॅजिंगमधील बीए ऑनर्स.
* फॅशन डिझाइनमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
* फॅशन मॅनेजमेंट अँड मार्केटिंगमधील एमबीए अभ्यासक्रम.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्जदारांनी पदवी अभ्यासक्रमासाठी बारावीची परीक्षा तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संबंधित विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
प्रवेश पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पुणेतर्फे घेण्यात येणारी ऑल इंडिया लेव्हल डिझाइन अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट ही प्रवेश पात्रता परीक्षा, स्टुडिओ टेस्ट व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित अभ्यासक्रमाच्या 2014-2015 या शैक्षणिक सत्रासाठी निवड करण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पुणेच्या दूरध्वनी क्र. 020-30693695 वर संपर्क साधावा. अथवा इन्स्टिट्यूटच्या www.mitid.edu.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व तपशिलवार प्रवेश अर्ज 31 जानेवारी 2014 पर्यंत पाठवावेत.
ज्या विद्यार्थ्यांना डिझाइन वा संबंधित विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल अशांसाठी हे अभासक्रम फायदेशीर ठरू शकतील.
कृषी व्यवस्थापन विषयातील
पदव्युत्तर पदविका
चौधरी चरणसिंह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल मार्केटिंगतर्फे व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या 2014-16 या सत्रांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी पशुवैद्यक, कृषी, कृषी विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध-व्यवसाय, फूड टेक्नॉलॉजी यासारख्या विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी 45%) उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते वरील पात्रता परीक्षेला बसलेले असावेत. याशिवाय अर्जदारांनी सीएटी, सीएमएटी यासारखी व्यवस्थापन अभ्यासक्रमविषयक प्रवेश पात्रता दिलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांची संबंधित पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व सीएटी/ सीएमएटीमधील गुणांकाच्या आधारे त्यांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अभ्यासक्रमाचा प्रवेश अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी 1000 रु.चा (राखीव गटातील उमेदवारांनी 500 रु.च्या) डायरेक्टर जनरल, एनआयएएम यांच्या नावे असलेला व जयपूर येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल मार्केटिंग, जयपूरच्या दूरध्वनी क्र. 0141-2795140 वर संपर्क साधावा. अथवा इन्स्टिट्यूटच्या www.cesniam.gov.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2014.