आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • D.W.Ambulkar Artical On Scholarship Competation Examination

शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा:कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट, हैदराबाद येथे उपलब्ध असणा-या कृषी व्यवस्थापन विषयातील दोनवर्षीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी कृषी, कृषी विज्ञान वा संबंधित विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते या पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचा परीक्षेला बसलेले असावेत. याशिवाय अर्जदार विद्यार्थ्यांनी सीएटी-2013 अथवा सीएमएटी 2013 यासारखी व्यवस्थापन अभ्यासक्रमविषयक प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
प्रवेश पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना त्यांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व व्यवस्थापन पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट हैदराबादच्या कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या 2014-16 या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश देण्यात येईल. प्रवेश प्रक्रिया साधारणपणे मे-जून 2014 मध्ये पूर्ण करण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमासंबंधी अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंटच्या दूरध्वनी क्र. 040-24581555 वर संपर्क साधावा अथवा अकादमीच्या http://www.naarm.ernet.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
प्रवेश अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज जॉइंट डायरेक्टर (अ‍ॅडमिन) अँड रजिस्ट्रार, नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट, राजेंद्रनगर, हैदराबाद 500030 (आंध्र प्रदेश) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2014.
कृषी वा कृषी विज्ञान विषयातील ज्या पदवीधरांना कृषी व्यवस्थापन विषयातील पदवयुत्तर पदविका अभ्यासक्रमासह आपले करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा अवश्य विचार करावा.
------------------------------------------
नॅशनल काउंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीची प्रवेश पात्रता परीक्षा - जेईई : 2014
नॅशनल काउंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीतर्फे घेण्यात येणा-या तीन वर्षे कालावधीच्या बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल मॅनेजमेंट या पदवी अभ्यासक्रमाचा 2014-15 या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या जॉइंट एन्ट्रस एक्झामिनेशन (जेईई-2014) या प्रवेश परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा इंग्रजीत घेऊन व चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : उमेदवार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांचे वय 1 जुलै 2014 रोजी 22 वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी 3 वर्षांनी शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना नॅशनल काउंसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजीतर्फे लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर 26 एप्रिल 2014 रोजी घेण्यात येईल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणा-या विद्यार्थ्यांना समूह चर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बीएस्सी, हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून उमेदवार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी 900 रु. (राखीव गटातील विद्यार्थ्यांनी 450 रु.) संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी काउंसिलच्या नि:शुल्क दूरध्वनी क्र. 1800-180-3151 वर संपर्क साधावा अथवा काउंसिलच्या www.nchmct.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज नॅशनल काउंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, ए-34, सेक्टर-62, नोएडा 201309 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2014.
बारावी उत्तीर्ण ज्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेटमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी विषयातील पदवीसह एक आगळे-वेगळे करिअर करण्याची इच्छा असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा अवश्य विचार करावा.
------------------------------------------
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे
विविध अभ्यासक्रम
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली येथे उपलब्ध असणा-या कायदा विषयांतर्गत विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभ्यासक्रमाचा तपशील व आवश्यक पात्रता :
१पाच वर्षे कालावधीचा बीए-एलएलबी पदवी अभ्यासक्रम : अर्जदारांनी 10+2 शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा कमीतकमी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते यावर्षी बारावीच्या परीक्षेला बसलेले असावेत.
वयोमर्यादा : विद्यार्थ्यांचे वय 1 जुलै 2014 रोजी 21 वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
१एक वर्षाचा एलएलएम अभ्यासक्रम : अर्जदारांनी कायदा विषयातील एलएलबी पदवी परीक्षा कमीतकमी 55% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी 50%) उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते एलएलबीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले असावेत.
१कायदा विषयातील संशोधनपर पीएचडी : अर्जदार विद्यार्थ्यांनी कायदा विषयातील पदव्युत्तर पदवी कमीतकमी 55% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी 50%) उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते पदव्युत्तर पदवी परीक्षेला बसलेले असावेत.
निवड पद्धती : अर्जदारांची निवड राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणा-या निवड पात्रता परीक्षेद्वारा घेण्यात येईल. ही निवड पात्रता परीक्षा मुंबईसह देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. अर्जदार विद्यार्थ्याची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या विद्यार्थ्यांनी 3000 रु.चा (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी 1000 रु.चा) रजिस्ट्रार, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या नावे असणारा व दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह पाठवावा.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्लीच्या http://nludelhi.admissionhelp.com
अथवा http:///www.nludelhi.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
प्रवेश अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज रजिस्ट्रार, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली सेक्टर-14, द्वारका, नवी दिल्ली-110078 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2014.
ज्या विद्यार्थ्यांना विषयातील विशेष अभ्यासक्रमांतर्गत पदवी, पदव्युत्तर व संशोधनपर पीएचडी अभ्यासक्रम करायचे असतील अशांसाठी ही संधी उपयुक्त ठरू शकते.