आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • D.W.Ambulkar Artical On Scholarship Cometation Examination

शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा: एल अँड टी कन्स्ट्रक्शनची विशेष शिष्यवृत्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एल. अँड टी. कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे एमटेक कन्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कंपनीतर्फे देण्यात येणा-या विशेष शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी 10 वी व बारावीची परीक्षा कमीत कमी 60% गुणांसह उत्तीर्ण करून त्यानंतर चालू शैक्षणिक सत्रात सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवी परीक्षा कमीत कमी 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय 1 जुलै 2014 रोजी 23 वर्षांहून अधिक नसावे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- सुरतकल व त्रिची येथे लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळवणा-यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांनी वरील शिक्षण संस्थांमधील एमटेक कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल.
शिष्यवृत्तीचा कालावधी व रक्कम : या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे कालावधीसाठी दरमहा 9000 रु.ची शिष्यवृत्ती व संबंधित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अथवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे शैक्षणिक शुल्क देण्यात येईल.
रोजगार संधी : वरील पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीपणे व चांगल्या शैक्षणिक आलेखासह पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना एल. अँड टी. कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये पुढील संधीसाठी प्राधान्य देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : या योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एल. अँड टी. कन्स्ट्रक्शनच्या www.Lntecc.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2014 आहे.
महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाची
कॉमन एन्ट्रस टेस्ट-2014
महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळातर्फे राज्यांतर्गत उपलब्ध असणा-या एमबीए, एमएमएस, व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम इ.च्या 2014-2015 या शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या राज्यस्तरीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असायला हवी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी 45% पर्यंत शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती : अर्जदारांना वर नमूद केल्याप्रमाणे एमबीए, एमएमएस वा व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कॉमन एन्ट्रस टेस्ट 2014 ही प्रवेश पात्रता परीक्षा द्यावी लागेल. ही प्रवेश पात्रता परीक्षा संगणकीय पद्धतीने राज्यातील विविध केंद्रांवर 15 व 16 मार्च 2014 रोजी घेण्यात येईल. अर्जदार विद्यार्थ्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारीव प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांनी 1000 रु. (राखीव गटातील विद्यार्थ्यांनी 800 रु.) राज्यातील अ‍ॅक्सिस बँकेच्या कुठल्याही शाखेत चलनद्वारा व रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाच्या दूरध्वनी क्र. 022-30233444, 30233445 वर संपर्क साधावा अथवा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या www.dtemaharashtra.gov.in/mba2014
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2014.