आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • D.V. Ambulakar Article About Scholarship Competition Examination, Divya Marathi

Divya Education शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाची कॉमन एन्ट्रस टेस्ट-2014
महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळातर्फे राज्यांतर्गत उपलब्ध असणा-या एमबीए, एमएमएस, व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम इ.च्या 2014-2015 या शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणा-या राज्यस्तरीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असायला हवी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी 45% पर्यंत शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती : अर्जदारांना वर नमूद केल्याप्रमाणे एमबीए, एमएमएस वा व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कॉमन एन्ट्रस टेस्ट 2014 ही प्रवेश पात्रता परीक्षा द्यावी लागेल. ही प्रवेश पात्रता परीक्षा संगणकीय पद्धतीने राज्यातील विविध केंद्रांवर 15 व 16 मार्च 2014 रोजी घेण्यात येईल. अर्जदार विद्यार्थ्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांनी 1000 रु. (राखीव गटातील विद्यार्थ्यांनी 800 रु.) राज्यातील अ‍ॅक्सिस बँकेच्या कुठल्याही शाखेत चलनद्वारा व रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाच्या दूरध्वनी क्र. 022-30233444, 30233445 वर संपर्क साधावा अथवा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या ६६६.dtemaharashtra.gov.in/mba2014
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2014.
सैन्यदलात महिला विधी पदवीधरांना संधी
सैन्यदलात थेट निवड योजनेअंतर्गत महिला विधी पदवीधरांची निवड करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदार महिलांनी बारावीनंतर विधी विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 55% गुणांसह उत्तीर्ण केली असावी. त्या बार काउंसिल ऑफ इंडियाकडे नोंदणी करण्यात पात्र व शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हव्यात.
वयोगट : उमेदवारांचे वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे व जन्म 2 जुलै 1987 ते 1 जुलै 1993च्या दरम्यान झालेला असावा.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना सैन्य निवड मंडळातर्फे निवड चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या उमेदवारांना सैन्यदलाच्या कायदा विभागात सुरुवातीला लेफ्टनंट म्हणून दरमहा 15600-39100+5400 या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.
अर्जाचा नमुना व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 11 ते 17 जानेवारी 2014 च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या ६६६.dtemaharashtra.gov.in/mba2014या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टोरेट जनरल ऑफ रिक्रुटिंग, आरटीजी-ए, जेएजी एंट्री, एजीज ब्रँच, आर्मी हेड क्वार्टर्स, वेस्ट ब्लॉक-3, आर. के. पूरम, नवी दिल्ली-110066 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2014.
कर्मचारी निवड आयोगाची
पदवीधर निवड परीक्षा - 2014
केंद्र सरकारचे विविध विभाग आणि कार्यालयांतर्गत कर्मचा-यांची निवड करण्यासाठी घेण्यात येणा-या राष्ट्रीय स्तरावरील पदवीधर निवड परीक्षा-2014 या निवड परीक्षेसाठी कर्मचारी निवड आयोगातर्फे खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी अर्थशास्त्र, गणित अथवा सांख्यिकी या मुख्य विषयासह अथवा गणित किंवा अर्थशास्त्र या मुख्य विषयासह पदवी पात्रता पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय 27 वर्षांहून अधिक नसावे, वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा 27 एप्रिल व 4 मे 2014 रोजी देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक व अमरावती या केंद्रांचा समावेश असेल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुण मिळविण्यास उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून 100 रु.ची निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणारी केंद्र सरकारची रिक्रुटमेंट टपाल तिकिटे अर्जावर लावणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 18 ते 24 जानेवारी 2014 च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://ssconline.nic.in किंवा http://ssconlinc2.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : महाराष्ट्रातील उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि रिक्रुटमेंट तिकिटांसह असणारे आपले अर्ज क्षेत्रीय निदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ किंवा प्रतिष्ठा भवन, 101, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई-400020 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2014.
dattatraya.ambulkar@gmail.com