आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, पाटणा येथे उपलब्ध असणार्‍या डेव्हलपमेंट मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणार्‍या प्रवेश परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असायला हवेत. ते सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांच्या गुणांची टक्केवारी 50% असायला हवी. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी 45%पर्यंत शिथिलक्षम आहे. याशिवाय अर्जदार विद्यार्थ्यांनी 2013 नंतरची ‘कॅट’ प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी, त्यांचे ‘कॅट’ व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना समूह चर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या दोन वर्षे कालावधीच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.

अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटातील अर्जदारांनी 1000 रु.चा (राखीव गटातील अर्जदारांसाठी 500 रु.चा) डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या नावे असणारा व पाटणा येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह इन्स्टिट्यूट कार्यालयात पाठवावा.

अधिक माहिती व तपशील : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या दूरध्वनी क्र. 0612-2219325 अथवा संस्थेच्या admissions@dmi.brlps.inया ई-मेलवर संपर्क साधावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, बीआरएलपी, 5 वा मजला, विस्कोमॅन भवन, गांधी मैदान, पाटणा 800001 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2014.
पुढे वाचा विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती....