आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नीत्यंभ्यंगम् अाचरेत’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियमित व राेज मालीश करावी. यामुळे अकाली वार्धक्य, कामामुळे येणारा थकवा व वाताशी निगडित अाजार हे टाळता येऊ शकतात.
अभ्यंग: तात्त्विक विचार
त्वचा रंध्रमय असून ती वाताचे विशिष्ट स्थान अाहे. अाणि स्पर्श हा त्वचेचा धर्म अाहे. त्वचेच्या बऱ्यावाईट स्थितीवर स्पर्शज्ञानाचे न्यूनाधिक्य अवलंबून अाहे व त्वचा घट व चिवट ठेवणे व त्वचा विकार हाेऊ न देणे हे कार्य अभ्यंगाने घडत असते. म्हणून अभ्यंग (मालिश) सर्व अंगाला नित्य करणे इष्ट हाेय. व्यायामाचा अभाव, बैठीजीवन शैली, अनियमित व नकाे ताे अाहार, मनावरील अनियंत्रित ताण, यासारख्या विकृतींना सध्याचा समाज बळी पडत अाहे. अशा जीवनशैलीत अभ्यंगामुळे शारीरिक विषारीतत्त्व घाम, मूत्र व लाळ याद्वारे सहजगत्या बाहेर पडतात. तसेच अभ्यंगातील घर्षणामुळे त्वचेलगत व अातील रक्तवाहिन्यांमधील रक्त पुरवठा सुरळीत हाेताना दिसून येताे. या व्यतिरिक्त अभ्यंगातील सर्व शरीरावर हाेणाऱ्या मालिशमुळे मानसिक तणाव ( Mental Relaxation) कमी हाेताना दिसून येताे. यामुळेच शरारातील अंतस्त्रावी ग्रंथाची ( Endocrine Glands) कार्य सुधारून संप्रेरक अनियमितता ( Hormonal Imbalance) पुन:स्थापित (Proper Balancing) हाेते. जसा अाहार (अन्न) बाहेरून शरीराचे पाेषण घडवून अाणताे, तसेच अभ्यंग (मालिश) शरीरातील अभ्यंतर घटकांचे कार्य उद्दिपीत करून शरीरातील प्रथीने (Hypo Protelnimia), शर्करा (Hyper or Hypoglycemia) व अन्य रासायनिक घटक यांचे संतूलन घडवून अाणण्यात मदत करते.
अभ्यंगम्: अभि-म्हणजे कडे जाणे अाणि अंगम् म्हणजे शरीर अर्थातअभ्यंग म्हणजे शरीराकडे जाणे. शरीराच्या जवळ जाणे. या क्रियेसाठी यासाठी सर्वात श्रेष्ठ वाहन म्हणजे हात. हात हे बाहेरची ऊर्जा अापल्या शरीरात खेचून अाणण्याचे कार्य करतात. नृत्यशास्त्रात हात हे समाेरच्या प्रेक्षकवर्गाला भावना व कथा या गाेष्टींची जाणीव करून देत असतात. तसेच परमेश्वराची पूजा करताना एकत्र जाेडलेले हात अापली ऊर्जा व मनाेबल वाढवण्याचे कार्य करतात. हाताचा अग्रभाग हे ऊर्जा एका जागेवरून दुसरीकडे वाहून नेण्यासाठी सर्वात श्रेष्ठ साधन मानलेले अाहे. जगात असे अनेक अद‌्भूत प्रयाेग फक्त हाताच्या बाेटांनी स्पर्श केल्यामुळे घडून अालेले दिसतात. अाईने अापल्या मुलांना केलेला स्पर्श, वृद्ध माता-पित्यांना सकाळी केलेला चरणस्पर्श, उत्तमज्ञान मिळवलेल्या शिष्यांना गुरूने दिलेला अाशीर्वादस्वरूपी स्पर्श, रुग्णाला वैद्याने नाडी तपासताना केलेला स्पर्श, या एकमेवाद्वितीय अद‌्भू्त गाेष्टी अाहेत.

नाट्यशास्त्रात अशी पद्धत अाहे की, ज्या दिशेला हात असतील त्या दिशेला डाेळे (नेत्र) असतात व ज्या दिशेला डाेळे असतात, त्या दिशेला मन असते व ज्या दिशेला मन असते, त्या दिशेला मनातील भाव असतात. अभ्यंगातसुद्धा हात, डाेळे, मन व भाव यांचा एकत्रित परिणाम ऊर्जास्वरूपी कंपन शरीराला मिळवून देण्याचे कार्य करताे.

कमीत कमी डाेळे, कान व तळपायाला तरी मालीशराेज करावीच
अष्टांग हृदय या अायुर्वेदातील श्रेष्ठ ग्रंथात ‘नीत्यंभ्यंगम् अाचरेत’ म्हणजे नियमित व राेज शरीराला मालीश करावी, असा उल्लेख दिलेला अाहे. धावपळीत जर संपूर्ण शरीराला मालीश करणे शक्य नसेल तर डाेळे, कान व तळपायाला मालीश राेज करावीच. यामुळे अकाली येणारे वार्धक्य, कामामुळे येणारा थकवा व वाताशी निगडित अाजार हे टाळता येऊ शकतात.
‘‘अभ्यंगाे वातहा पुष्टिस्वप्नदाढर्यबृहत्वकृत
दग्धभग्नशतरुजाक्लम श्रम जरापह:!
रथाक्षचर्मघटवतभवन्ति अभ्यंगताे गुणा:!! अ.सं.सू.अ.

नित्य अभ्यंग केल्याने
* शरीर पुष्ट हाेते * झाेप शांत येते * शरीराची त्वचा जाड व चिवट हाेते * त्वचा भाजल्यामुळे, हाड माेडल्यामुळे किंवा शस्त्र किंवा अाघाताने जखम झाल्यामुळे हाेणारी पीडा शमते * चालण्यामुळे प्रवासामुळे किंवा मानसिक श्रमांनी अालेला थकवा नाहीसा हाेताे * त्वचेला सुरकुत्या पडणे * केस पांढरे हाेणे * दृष्टी मंद हाेणे * कमी एेकू येणे. यासारखी म्हातारपणाची चिन्हे सहसा उत्पन्न हाेत नाहीत व शरीराची प्रतिकार शक्ती वाढून वारंवार अाजारी पडण्याची प्रक्रिया थांबते.
गाडीच्या चाकाला तेल देत राहिल्याने (वंगण करत राहिल्याने) जसे चाक न कुरकुरता पुष्कळ दिवस सुरळीत चालते, चामड्याचे पादत्राण वगैरे वस्तू दीर्घकाळ टिकतात. मातीचा घडाही टणक राहताे. तसेच परिणाम अभ्यंगाने शरीरावरही हाेतात.
अभ्यंग स्थान : अभ्यंग नियमित करणे अपेक्षित अाहे. परंतु जर असे करणे शक्य नसेल तर डाेळे, कान व तळपाय यांना अभ्यंग नियमित करावे.
शिराेअभ्यंग
डाेक्यावर अभ्यंग केल्याने केस मजबूत, काळे कुळकुळीत व लांब सडक हाेतात व डाेक्याची कवटी अाणि तिच्यात असलेली ज्ञानेंद्रियाची मेंदूतील केंद्रस्थाने प्रसन्न राहतात व झाेप शांत येते.
कर्णअभ्यंग
कानाला मालीश केल्यामुळे हनवुटी, मान, डाेळे व कानात शूळ हाेत नाही व हाेणारा दुखावा नाहीसा हाेताे. कानाला बधिरपणा येत नाही.

पादाभ्यंग
खरत्वं स्तब्धता राैक्ष्यं श्रम: सुप्तिश्च पादयाे! सद्य एवाेपशाम्यत्नि पादाभ्यड्:गनिषेवणात;।।
जायते साैकुमार्यं च बलं स्थैर्यं च पादयाे:। दृष्टि:प्रसादं लभते मारुश्चाेपशाम्यति।। न च स्यात; गृध्रसीवात: पादयाे
स्फुटनं न च। न सिरास्नायुसंकाेच: पादाभ्यड्:गेन पादयाे:।। (चरकसंहिता)
पायांना अभ्यंग केल्यास पायांचा रखरखीतपणा, पाय जखडणे, रुक्षता, थकवा, बधिरता, मुंग्या येणे वगैरे त्रास नाहीसे हाेतात. पाय काेमल हाेतात व त्यांचातील बल व स्थिरता वाढते, डाेळ्यांची अाग व लाली कमी हाेऊन डाेळे प्रसन्न हाेतात. वाताचे शमन हाेते, सायटिकासारखे पायांचे अाजार हाेत नाहीत. पायांना भेगा पडत नाहीत व सिरास्नायुंचा संकाेचही हाेत नाही.
-मुळाला पाणी घातल्याने जसे झाड सर्व बाजूंनी बहरते. तसेच पादाभ्यंग केल्याने संपूर्ण शरीराचे पाेषण हाेते.

थाेडासा रिकामा वेळ असताना स्वत: स्वत:ला किंवा शक्यता असल्यास दुसऱ्याने तळपायांना थाेडेसे तूप लावून प्रत्येक पाय १० मिनिटे काशाच्या वाटीने घासावेत. अाज -कालच्या धकाधकीच्या जीवनात सर्व अंगाला अभ्यंग करणे शक्य नसेल, तर निदान पादाभ्यंग तरी नियमित करावे, तसेच दर १५ दिवसांतून जमेल त्यांनी पंचकर्म उपचार केंद्रात जाऊन प्रशिक्षित परिचारकाकडून मसाज करून घ्यावा.
बातम्या आणखी आहेत...