आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडेल कार्नेगी. कुठल्याही दुकानात, प्रदर्शनात, महोत्सवात कार्नेगीचे पुस्तक दिसत नाही आणि त्यावर वाचकांच्या उड्या पडत नाहीत, असे कधीही घडत नाही. त्यांचे ‘हाऊ टु विन फ्रेंडस अँड इन्फ्लुएन्स पीपल’ हे केवळ पुस्तक नव्हे, वैश्विक असे गाइडच. एखाद्या व्यवसायात किंवा मित्रांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी, चांगला सेल्समन होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, त्यांची यादी हे पुस्तक देईल. सर्वप्रथम तुमचे व्यक्तिमत्त्व लोकांना आवडायला हवे. तुमच्याशी लोकांना मैत्री करावीशी वाटली पाहिजे. कार्नेगी सांगतात, ज्यांना अधिक मित्र असतात ती माणसे व्यवसायात यशस्वी होतात. म्हणून अधिक मित्र जोडल्यास तुम्ही अधिक यशस्वी होऊ शकता. पण मित्र कसे जोडायचे याबद्दल कार्नेगी सांगतात, की अगदी परक्या माणसाचेही भेटल्यावर त्याच्या एखाद्या वैशिष्ट्याचे किंवा गुणाचे अॅप्रिसिएशन करा, म्हणजे त्याला मनापासून दाद द्या. यातली गोम अशी, की यामुळे समोरच्या व्यक्तीमध्ये दाद देण्याजोगे काय आहे, याचा आपण विचार करतो. थोडक्यात, माणूस पॉझिटिव्ह विचार करतो. दुसरे म्हणजे, समोरच्या व्यक्तीमध्ये आणि त्याच्या आवडत्या विषयांत रस घ्या. थोडक्यात, त्याला महत्त्व द्या. इगोला कुरवाळणे लोकांना आवडत असते. माणसांची नावे लक्षात ठेवायला शिका. अर्थात, त्यासाठीही काही युक्त्या आहेत. उदा. माणसाचे वर्णन त्याच्या नावाशी जोडणे (म्हणजे टकले आडनावाच्या माणसाच्या डोक्यावर खूप केस आहेत, हे लक्षात ठेवण्यासाठी टकलेंच्या डोक्यावर केस आहेत, असे म्हणणे. म्हणजे तो माणूसही लक्षात राहतो व वैशिष्ट्यही).
डेल कार्नेगीने हे पुस्तक ज्या काळात लिहिले, त्या वेळी म्हणजे 1936 मध्ये अमेरिका एक मोठे राष्ट्र म्हणून आकार घेत होते. मोठे उद्योग उभे राहत होते. उत्पादने येत होती. ती विकण्यासाठी सेल्समन नावाचा नवीनच रोजगार उपलब्ध झाला होता. मुख्य म्हणजे, सेल्समन किंवा सेल्सगर्ल व्हायला फार मोठे शिक्षण वा क्वालिफिकेशनची गरज नव्हती. 1930 मध्ये उत्पादन आणि विक्रीचा मेळ न बसल्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादने पडून राहिली व मंदी आली. इतरही कारणे मंदीला कारणीभूत होती. पण मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून मार्केटिंगचे तंत्र कार्नेगीने शिकवायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने ‘डेल कार्नेगी इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. त्यातून 85 लाख विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. आपले उत्पादन गळी उतरवण्याचे कार्नेगीचे कौशल्य या पुस्तकाबाबतही दिसते. कार्नेगी सांगतात, ‘हे पुस्तक वाचायला सुरुवात करा आणि तुम्हाला जर हे पुस्तक आवडले नाही तर 15 मिनिटांनी बाजूला ठेवा.’ मात्र एकदा का ते वाचायला घेतले की ते हातातून ठेववत नाही.
मी कॉलेजात असताना हे पुस्तक वाचले आणि मला त्याचा उपयोग झाला. आपल्या सगळ्यांना कधी-कधी नोकरी किंवा कामात बोअरिंग गोष्टी कराव्या लागतात, त्याबद्दलही त्यांनी दुसर्या पुस्तकात लिहिले आहे. तेही बेस्ट सेलर ठरले. हे पुस्तक ताणतणाव कसा घालवायचा आणि कामात आनंद कसा घ्यायचा, यावर आहे. टायपिंगचे रूटीन काम करणारी माणसे तेच काम कसे स्पर्धा लावून रंजक करत, याबद्दल त्यांनी लिहिले आहे. कामात आणि जगण्यात आनंद घ्यावा. समोरच्याचे म्हणणे नीट ऐकावे. आपली कौशल्ये वाढवावीत. वादविवाद टाळावे. माणसे नीट वाचावीत. त्यांना जे हवे ते देऊन त्यांच्याकडून चांगले काम करून घ्यावे. इतरांना महत्त्व द्यावे. साध्याच कल्पना रंजक रीतीने मांडाव्यात. आकडेवारी, गमतीदार उदाहरणे देत रंजक करावीत. हे सारे डेल कार्नेगीने पाऊणशे वर्षांपूर्वी लिहिले आहे. आज व्यवस्थापन आणि विक्रीशास्त्रात तेच शिकवले जाते. मी स्वत: काही काळ जाहिराती मिळवण्याचे काम करायचो. एकदा एका मॅनेजरने माझे काही ऐकून न घेता जायला सांगितले; पण कार्नेगी फॉर्म्युला वापरून मी त्याच्याशी बोललो. निघताना तो म्हणाला, पेपर चालू असेपर्यंत आमची जाहिरात चालू राहील....
shashibooks@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.