आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट औषध निर्मितीचा धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट औषधांची निर्मिती आरोग्याला मोठा धोका निर्माण करते. ही समस्या तशी सर्वत्र असते. आपल्याकडे त्याचे प्रमाण जास्त आहे, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय औषध कंपन्या तसेच डब्ल्यूएचओ यासारखी संघटनाही असेच मत मांडत असते. पण हे संपूर्ण सत्य नाही. बनावट औषधांमुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या औषधांच्या विक्रीवर परिणाम होतो. वास्तविक बनावट औषधांचे प्रमाण इतर देशांइतकेच आपल्याकडे आहे. ही आकडेवारी बाजूला ठेवून या गंभीर समस्येकडे पाहिले पाहिजे. कारण यात पेशंटच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन प्रसंगी त्याला मृत्यूही येऊ शकतो.

सर्वसामान्यांना बाजारात कोणती बनवट औषधे येऊ शकतात, कोणती आलेली आहेत याची माहिती आपण दिली पाहिजे. यासंदर्भात गुजरातमध्ये घेतली जाणारी दक्षता वाखाणण्यासारखी आहे. अशा बनावट औषधांची माहिती देण्यासाठी त्यांनी एसएमएस अलर्ट सिस्टिम विकसित केली आहे. गुजरातच्या एफडीसीएने हे एसएमएस मॉडेल लाँच केले असून अत्यंत कमी स्वरूपात पेशंटना अशा फेक औषधांची माहिती एसएमएसच्या माध्यमाद्वारे दिली जाते. याशिवाय संबंधितांनाही मेसेज पाठवून जागृत केले जाते. हू (WHO)ला अत्यंत कमी खार्चाचे हे मॉडेल पसंत पडले आहे. इतर विकसनशील देशांनीही त्याचा स्वीकार करावा, असा त्यांचा आग्रह आहे. नुकतीच हू (WHO)च्या पदाधिकार्‍यांनी गुजरातला भेट दिली. गुजरातच्या एफडीसीएच्या अधिकार्‍यांशी त्यांनी चर्चा केली व अभ्यास केला. पेशंटच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे या उद्देशाने हू (WHO) संघटना या उपक्रमाकडे पाहत आहे. या मॉडेलच्या साहाय्याने आतापर्यंत 60 अ‍ॅर्टस पाठवण्यात आली आहेत. बनावट औषधांची थेट माहिती पब्लिक व संबंधित संस्थांना देण्यात आली आहे. भारतातील इतर राज्यांनाही या मॉडेलसंबंधी उत्सुकता आहे व गुजरातचे हे उदाहरण त्यांनाही आत्मसात करावयाचे आहे. एक रोल मॉडेल बनण्याचा गुजरातचा प्रयत्न खरोखरीच कौतुकास्पद म्हणावा लागेल. अनेक नवनवीन योजना त्यांनी स्वीकारल्या आहेत. आपल्याकडे उद्योगधंदे यावेत, परकीय गुंतवणूक व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक सवलती देऊ केल्या आहेत. पश्चिम बंगाल सरकारने बाहेरचा रस्ता दाखवलेला प्रोजेक्ट क्षणाचाही विलंब न लावता गुजरात सरकारने आपल्या राज्यात आणलं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं त्यांचं काम इतर राज्यांनीही लक्षात घेतलं पाहिजे. यासंबंधीचे धडे आता गुजरातकडून घेतले पाहिजेत.